Raksha Bandhan 2020 Gift Ideas: रक्षाबंधन सणानिमित्त आपल्या लाडक्या बहिणीला कायम स्मरणात राहतील अशा हटके गिफ्ट आयडियाज
चला तर माहित करुन घेऊया असे भन्नाट गिफ्ट आयडियाज विषयी:
Raksha Bandhan Gift Ideas: भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याला एका धाग्यात बांधणारा सण म्हणजे रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण! या सणादिवशी बहिणींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. भावाला राखी खरेदी करण्यापासून आपल्या लाडक्या भाऊरायासाठी पंचपक्वाने बनविण्यापर्यंत काय करू आणि काय नको असी अवस्था असतो. तसे यामागे थोडं खोडकर पद्धतीने सांगायचे झाले तर भावांकडून हक्काने भेटवस्तू घेणे हा एक गुप्त दडलेला हेतू असतो असंही म्हणायला हरकत नाही. यंदा लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अनेक भेटवस्तू ऑर्डर करु शकता.
यात हटके ग्रीटिंग्स (Greetings), चॉकलेट्स बॉक्स (Chocolate Box)असे अनेक पर्याय तुम्हाला मिळतील. चला तर माहित करुन घेऊया असे भन्नाट गिफ्ट आयडियाज विषयी:
1. शॉपिंग वाउचर
मुलींना शॉपिंग करणे प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्ही त्यांना शॉपिंगचे वाउचर देऊ शकता.
2. स्पा अपॉईंटमेंट
सध्या लॉकडाऊन घराबाहेर पडणे जोखमीचे आहे. मात्र लॉकडाऊन संपल्यावर खबरदारी घेऊन तुमच्या बहिणीला स्पा अपॉईंटमेंट गिफ्ट म्हणून देऊ शकता. Raksha Bandhan 2020: रक्षाबंधन सणाला भावासाठी घरच्या घरी कशा बनवाल राखी? (Watch Video)
3. चॉकलेट
चॉकलेट मुलींना खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही छान चॉकलेट बॉक्स त्यांना गिफ्ट करु शकतात.
4. छान गॅजेट्स
ऑनलाईन तुम्ही आपल्या बहिणीसाठी ब्लूटुथ, हेडफोन, वॉच, मोबाईल यांसारखे गॅजेट्स गिफ्ट करु शकता.
5. सौंदर्यप्रसाधनं
तुमच्या बहिणीला ऑनलाईन तिच्या आवडत्या ब्रँडचे कॉस्मेटिक्स खरेदी करु शकता.
मग वाट कसली बघताय खूप कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकर ऑनलाईन पर्यायांचा वापर गिफ्ट ऑर्डर करा. कारण जर गिफ्ट वेळेत आले नाही तर तुमच्या बहिणीच्या तावडीतून तुम्हाला कोणीही सोडवू शकणार नाही.