Propose Day 2021 Gift Ideas: 'प्रपोज डे' निमित्त तुमच्या पार्टनरला आपल्या मनातील गोष्ट सांगत खुश करण्यासाठी 'या' आयडियाज येतील कामी

तसेच पार्टनरला एखादं शान गिफ्ट देत आपल्या मनातील गोष्ट पोहचवण्यासाठी कोणत्या हटके गोष्टी करता येतील याचे सुद्धा प्लॅनिंग सुरु झाले आहेत.

Propose Day (Photo Credits: Pixabay)

Propose Day 2021 Gift Ideas: व्हेलेंटाईन वीकला आता सुरुवात होणार असून आतापासूनच कपल्स मध्ये त्याबद्दल मोठा आनंद दिसून येऊ लागला आहे. तसेच पार्टनरला एखादं शान गिफ्ट देत आपल्या मनातील गोष्ट पोहचवण्यासाठी कोणत्या हटके गोष्टी करता येतील याचे सुद्धा प्लॅनिंग सुरु झाले आहेत. अशातच जर तुम्ही प्रथमच एखाद्याला आपल्या मनातील भावना सांगणार असाल तर यंदाच्या व्हेलेंटाईन वीक मधील प्रपोज डे च्या दिवसाची संधी दवडू नका. कारण आजच्या दिवशी जर तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीला प्रपोज केल्यास तुम्हाला त्याचे उत्तर व्हेलेंटाईन डे पर्यंत नक्कीच मिळेल. पण जर प्रपोज करताना काय करावे आणि काय नक्की पार्टनरला गिफ्ट द्यावे याचा विचार करत असाल तर चिंता करु नका. कारण आम्ही तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहोत.

व्हेलेंटाईन वीक मधील पहिला दिवस रोज डे नंतर लगेच 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला पसंद करत असाल आणि मनातील गोष्ट सांगण्यास घाबरत असल्यास प्रपोज डे च्या संधीचा फायदा घ्या. तसेच तिला खुश करण्यासाठी 'या' काही सोप्प्या आणि हटके आयडियाज वापरुन तिच्या समोर आपल्या भावना व्यक्त करा.(Rose Day 2021 Gift Ideas: गुलाबाच्या फूला सोबत या गिफ्ट्स ने स्पेशल करा तुमच्या साथीदाराचा यंदाचा रोज डे!)

>>पर्सनालाईज्ड गिफ्ट

तुमच्या पार्टनरला प्रपोज डे च्या दिवशी तुम्ही एखादे पर्सनालाईज्ड गिफ्ट देऊ शकता. हे गिफ्ट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येईल किंवा तुम्ही सुद्धा घरच्या घरी तयार करु शकता. फक्त त्या गिफ्टच्या माध्यमातून आपल्या भावना नक्कीच समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहचवल्या जातील याकडे लक्ष द्या.

>>चॉकलेट्स आणि गुलाब

जर तुमच्या पार्टनरला चॉकलेट्स खुप आवड असल्यास विविध शेप मध्ये येणाऱ्या चॉकलेट्सची खरेदी करा. पण खासकरुन जर तुम्ही I Love You असे शब्द लिहिलेली किंवा त्या अक्षराची चॉकलेट्स एका बॉक्स मध्ये भरुन पार्टनरला देऊ शकता. त्याचसोबत गुलाबाची फुले सुद्धा द्या जेणेकरुन गिफ्टच सौंदर्य अधिक वाढल्यासारखे दिसेल.

>पार्टनरला डेट वर घेऊन जा

तुम्ही पार्टनरला न सांगता एखाद्या रेस्टॉरंट किंवा बीचच्या जवळ डेट साठी घेऊन जाऊ शकता. त्यावेळी बोलण्याबोलण्यातून तुम्ही योग्य वेळ पाहून पार्टनरला सर्वांसमोर प्रपोज करत आपल्या मनातील गोष्ट सांगितल्यास पार्टनरला आधी धक्का बसेल पण तो सुखदच असेल. कारण बहुतांश पार्टनर्सला सर्वांसमोर प्रपोज करणे फार आवडते.

>>कपल रिंग्स

ऐकायला ही गोष्ट जितकी कॉमन वाटते तितकीच स्वतःच्या पार्टनरने केल्यावर रोमँटिक वाटू शकते. तुमच्या दोघांच्या नावाचे इनिशियल्स असणारी एखादी छोटी प्रॉमिस रिंग तुम्ही गिफ्ट देऊ शकाल. जर का गुढघ्यावर बसून तुम्ही अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर रिंग इज मस्ट!

>>तुम्ही निवडलेला पार्टनर तुम्हाला का आवडतो हे सांगणारा गिफ्ट बॉक्स किंवा एखादे ग्रिटिंग

तुम्ही जेव्हा एखाद्याला पसंद करता तर का?  असा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल ना. त्यामुळे प्रपोज डे च्या दिवशी हिच गोष्ट तुम्ही सांगण्यासाठी जर घाबरत असाल तर मनातील भावना सांगण्यासाठी एकादे ग्रिटिंग किंवा गिफ्ट बॉक्स देऊ शकता. त्यात तुम्हाला पार्टनरच्या कोणत्या गोष्टी आवडतात जेणेकरुन तो तुम्हाला परफेक्ट पार्टनर आहे असे वाटते ते त्यात लिहा.

तर पार्टनरला गिफ्ट द्यायचं तर काहीतरी युजफूल देऊ असं म्हणतील जातं तुम्हीही हाच विचार करत असाल तर एखाद टीशर्ट, ज्वेलरी वैगरे हे पर्याय सुद्धा तुम्हाला निवडता येतील. मात्र प्रपोज करताना थोडं हटके गिफ्ट द्यायचं तुमच्या मनात असेल तर एकदा वरील सर्व ऑप्शन्सचा विचार नक्की करा. ऑल द बेस्ट!