Prabodhini Ekadashi 2023 Messages In Marathi: प्रबोधिनी एकादशीच्या शुभेच्छा Facebook Messages, Wishes, WhatsApp Status द्वारा शेअर करत साजरी करा कार्तिकी एकादशी!
वारकर्यांसाठी खास असलेल्या आजच्या एकादशीच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांसोबत नक्की शेअर करा.
प्रबोधिनी एकादशी (Prabhodini Ekadashi) अर्थात कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्त सध्या राज्यात विठ्ठल-रूक्मिणीची मंदिरं सजली आहेत. विठू भक्त मजल दरमजल करत दिंड्या पालख्या घेऊन पंढरपूरामध्ये (Pandharpur) हजर होतात. यंदाही मोठ्या उत्साहात पंढरपूरासह अवघ्या महाराष्ट्रात कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबरला साजरी होत आहे. या दिवसाचं औचित्य साधत तुम्हांलाही या मंगल पर्वाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, विठू माऊलीच्या भक्तांना द्यायच्या असतील तर लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही ग्रिटिंग्स तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.
कार्तिक एकादशी हा विठू भक्तांसाठी वर्षातील महत्त्वाच्या दोन एकादशींपैकी एक दिवस असतो. आषाढी एकादशी नंतर 4 महिन्यांनी येणारी कार्तिकी एकादशी पुन्हा नव्या आशा-अपेक्षा घेऊन येते. निद्रावस्थेमध्ये गेलेले भगवान विष्णू पुन्हा सारा सृष्टीचा कारभार हाती घेतात. नव्या आणि मंगल कार्यांना कार्तिकी एकादशी नंतर सुरूवात होते. Pandharpur Vitthal Rukmini Darshan: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून पंढरपूर मंदिरात विठ्ठल-रूक्मिणीचं 24 तास दर्शन .
प्रबोधिनी एकादशीच्या शुभेच्छा
तुझा रे आधार मला, तूच रे पाठिराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा, चूका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो
प्रबोधिनी एकादशीच्या च्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल रूक्मिणीच्या भक्तांना
प्रबोधिनी एकादशी निमित्त
मंगलमय शुभेच्छा!
पाणी घालतो तुळशीला वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना हीच प्रार्थना पांडुरंगाला
प्रबोधिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रबोधिनी एकादशीच्या शुभेच्छा!
पंढरीची वारी जयाचिये कुळी
त्याची पायधुळी लागो मज
प्रबोधिनी एकादशीच्या विठू भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
प्रबोधिनी एकादशी निमित्त पंढरपूरासह देहू, आळंदी सह राज्यातील सारीच विठ्ठल मंदिरं भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. या निमित्ताने वैष्णवांचा मेळा जमतो आणि विठूनामाच्या गजरामध्ये तल्लीन होतात. महाराष्ट्रात असलेली भागवत संप्रदायाची मोठी परंपरा वारकरी जपत आहेत. कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी अखंड नामस्मरण, अभंग, भजन-कीर्तनामध्ये रंगून जातात.