PM Narendra Modi's Birthday Special: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाची 10 वाक्ये, ज्यांची अनेकदा होते चर्चा
भारतातील आजघडीची सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर भाषणात दिलेल्या माहितीनुसार एक चहावाला ते पंतप्रधान हा त्यांच्या प्रवास मोठा रंजक राहिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (PM Narendra Modi's Birthday) वाढदिवस. भारतातील आजघडीची सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर भाषणात दिलेल्या माहितीनुसार एक चहावाला ते पंतप्रधान हा त्यांच्या प्रवास मोठा रंजक राहिला आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जरी स्वत:ला चहावाला म्हणत असले तरी, त्यांचे सख्खे भाऊ प्रल्हाद मोदी मात्र त्यांना चहावाला मानत नाहीत. प्रल्हाद मोदी यांचे म्हणने असे की त्यांचे वडील चहावाला होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना चहावाल्याचा मुलगा म्हणायला हवे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चहावाला होते की नाही याबाबत दुमत असले तरी त्यांनी देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत घेतलेली झेप अनेकांना कौतुकास्पद वाटते. खास करुन त्यांचे भाषण अनेकांवर गारूड टाकते. त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या भाषणांमधील ही काही खास वाक्ये. ज्यांची देशभरात आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चीली गेली.
- भारत हा एक युवकांचा देश आहे. हा एक असा देश आहे जिथे तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ही ताकद जगाचे भविष्य बदलू शकते.
- लोकांचे आशीर्वाद आपल्याला न थकता काम करण्याची प्रेरणा देतात. फक्त त्यासाठी कटीबद्धता हवी.
- मी खूप गरीब कुटुंबात जन्माला आलो. लहानपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकत असे. माझी आई भांडी घासायची. दिवसभराची भाकरी मिळविण्यासाठी आम्ही दुसऱ्यांच्यात काम करत असे.
- मी गरीबी फार जवळून पाहिली आहे. मी गरीबीत राहिलो आहे. माझे संपूर्ण बालपण गरीबीत गेले आहे.
- भारताला खूप वेगाने पुढे जायला हवे. जेव्हा प्रत्येक भारतीय समृद्ध होईल तेव्हाच हे शक्य होणार आहे. गरीबी संपवणे ही आमची जबाबदारी आहे.
- विज्ञानामध्ये अयशस्वी होण्यासारखे काही नसते. तिथे केवळ प्रयत्न आणि प्रयोग होतात.
- आपणा सर्वांमध्ये बरे वाईट गुण असतात. जो सद्गुणांवर लक्ष देतो तो यशस्वी होतो.
- आम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल. आम्हाला सर्वांना सोबत विचार करावा लागेल. एका ध्येयाने काम काम करावे लागेल. तरच देश पुढे जाईल.
- दृढता आणि तपश्चर्या हा भारतीय मुल्यांचे केंद्र आहे. आमच्या गौरवशाली इतिसाहात देशाने हे दिवस पाहिले आहेत. ज्याने आमची गती कमी केली. परंतू आम्ही भावनांना दबू दिले नाही. आम्ही आणखी चांगले स्थान मिळवले.
- आपण बदल पाहू शकता. पण त्यासाठी आपल्याला ते बनावे लागेल. जे आपण करु इच्छिता.