Chandra Grahan 2019 On 16 July: गुरू पौर्णिमेदिवशी दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण ऑनलाईन कसे बघाल Live?
हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. यंदा तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आल्याने हे ग्रहण खास असणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष ग्रहण पाहणे शक्य नसेल तर Live Streaming च्या माध्यमातूनही तुम्ही हा दुर्मीळ योग पाहू शकता.
Chandra Grahan 2019 Live Streaming: आज, म्हणजेच 16 जुलैला या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. ही एक खगोलीय घटना असून, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते ज्यामुळे चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येत नाही परिणामी अंधार होतो आणि याच स्थितीला चंद्रग्रहण असे म्हणतात.यंदा 16 आणि 17 जुलैच्या दरम्यान रात्री 12 वाजून 13 मिनिटांनी ही प्रक्रिया सुरु होईल. तर 1 वाजून 31 मिनिट 43 सेकंदांनी चंद्रग्रहण लागेल असे सांगण्यात येत आहे. सुमारे 3 तास चालणारे हे चंद्रग्रहण भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, आफ्रीका, आशिया, यूरोप आणि दक्षिण अमेरिका येथूनही दिसणार आहे.
यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तब्बल 149 वर्षाने चंद्रग्रहणाचा योग जुळून आल्याने हे ग्रहण खास आहे, त्यामुळे जर का तुम्हाला प्रत्यक्ष ग्रहण पाहणे शक्य नसेल तर तुम्ही Live Streaming च्या माध्यमातून हा दुर्मीळ योग पाहू शकता.
इथे पहा आजच्या खंडग्रास चंद्र ग्रहणाचे Live Streaming
(हे ही वाचा - Chandra Grahan 2019: ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी?)