Parents Day 2020 Messages: 'जागतिक पालक दिन' निमित्त मराठी Wishes, Greetings, Images, Messages शेअर करून आपल्या आई-वडिलांना Facebook, WhatsApp च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!
1 जून 2012 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने जगभरातील पालकांचे प्रेम, वचनबद्धता आणि निःस्वार्थ प्रयत्नांना त्यांच्या मुलांकडे सन्मानित करण्यासाठी आणि मान्य करण्यासाठी हा दिवस 'जागतिक पालक दिन' म्हणून घोषित केला.
Parents Day 2020 Messages: 1 जून हा दिवस सर्वत्र 'जागतिक पालक दिन' म्हणून साजरा केला जातो. 1 जून 2012 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने जगभरातील पालकांचे प्रेम, वचनबद्धता आणि निःस्वार्थ प्रयत्नांना त्यांच्या मुलांकडे सन्मानित करण्यासाठी आणि मान्य करण्यासाठी हा दिवस 'जागतिक पालक दिन' म्हणून घोषित केला.
प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांची म्हणजेच पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येक पालक आपल्या पाल्यासाठी खूप मोठ योगदान देत असतो. जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात सद्गुण आणण्यासाठी साहाय्य करतो, तोच खरा पालक. आज 'जागतिक पालक दिन' निमित्त मराठी Wishes, Greetings, Images, Messages शेअर करून आपल्या आई-वडिलांना Facebook, WhatsApp च्या माध्यमातून खास शुभेच्छा देण्यासाठी खालील शुभेच्छापत्र तुम्हाला नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Summer Health Tips: उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या पन्हे बनविण्याची योग्य पद्धत)
वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही...
आई पेक्षा मोठं जग कोणतचं नाही..
जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
आई - बाप ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे,
ज्याच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताचं मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही...
जागतिक पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
मनातलं जाणणारी आई आणि
भविष्य ओळखणारा बाप म्हणजे
जगातील एकमेव ज्योतिष
जागतिक पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
मातृ देवो भव...
पितृ देवो भव
जागतिक पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात
पण आईवडिलांच प्रेम कधीच बदलत नाही
कारण, ते प्रेम निस्वार्थ असतं.
जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
आई-बाबा या दोन शब्दांचं आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. आईची महती सांगताना आपण नेहमी 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी,' असं म्हणतो. मुलांना वडिलांपेक्षा आई अधिक प्रेमळ वाटते. मात्र, वडिल काहीशी ताठर भूमिका घेत मुलांना संस्काराचे धडे देत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिल हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत.