Pandharpur Wari 2023 Special Train: वारकऱ्यांसाठी खूशखबर! पंढरीच्या दरबारी आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वे सोडणार 76 विशेष ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक
मध्य रेल्वेकडून अधिकृत माहिती दिली जात आहे. पंढरपुरात जाण्यासाठी वारकऱ्यांना 3 जुलै पर्यंत गाड्या मध्य रेल्वेकडून सोडल्या जाणार आहे.
Pandharpur Wari 2023 Special Train: आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रखूमाईची भेट घेण्यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने (Central Railway) आनंदाची बातमी दिली आहे. विठ्ठल भेटीची आस घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष 76 रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. ही रेल्वे सेवा 23 जून ते 3 जुलै या कालावधीत सुरु राहणार असल्याची माहिती, मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्विटर अंकाउट वरुन देण्यात आली आहे. राज्यातील वारकऱ्यांना सुलभतेने पंढरपूरला जाता यावे यासाठी रेल्वेने ही विशेष सेवा सुरु केली आहे. या विशेष रेल्वेसेवेचे वेळापत्रकही मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. आपणही हे वेळापत्रक येथे जाणून घेऊ शकता.
नागपुर ते मिरज पर्यंत विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. विशेष म्हणजे ह्या गाड्या 3 जुलैपर्यंत चालू राहणार आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ भागातून ह्या गाड्या चालणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सर्व वारकऱ्यांनी उपस्थित राहावे याकरिता मध्य रेल्वे सेवा देत आहे.
रेल्वे क्रमांक 01205/01206 नागपुर ते मिरज साठी ( 2+2 =४) फेऱ्या विशेष सेवेत हजर राहतील. नागपुर येथून सकाळी ९ वाजता रेल्वे निघेल आणि रात्री 12 वाजता मिरज स्थानकांवर पोहचेल. रेल्वे क्रमांक 01207/01208 नागपुर ते पंढरपुर अशी एक गाडी सोडण्यात येणार आहे. नागपुर स्थानकावरून 8.50 ला निघेल आणि पंढरपुरला सांयकाळी 8च्या दरम्यान पोहचेल. रेल्वे क्रमांक 01119/01120 नवी अमरावती ते पंढरपुर पर्यंत अशी गाडी सोडण्यात येईल. दुपारी 2.40 वाजता नवी अमरावती वरून निघेल तर रात्री 9 वाजता पंढरपुर स्थानकावर सोडेल. खामगावपासून सकाळी 11 वाजता निघेल तर पहाटे 3.30 वाजता पोहचेल.