Pandharpur Wari: ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रिटिंग्स, SMS, Wishes,Images, WhatsApp Status

आजपासून वारकरी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. यंदा १२ जुलै दिवशी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे.

Pandharpur Wari 2019 (File Photo)

Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Prasthan 2019:  काल (24 जून) तुकारामांच्या पालखी (Sant Tukaram Palkhi) सोहळ्यानंतर आज (25 जून) आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे (Sant Dnyaneshwar Mauli Palkhi) प्रस्थान होणार आहे. सामान्यांना भक्तीचा आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात रूजवण्याचं आणि वृद्धिंगत करण्याचं मोठं श्रेय संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींना जातं. आजपासून ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात नाचत -गात वारकरी मंडळींचा प्रवास विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात ही वारकरी संप्रदयाची प्रथा अखंड सुरू ठेवणार्‍या या वैष्णवांचा पुढील 20 दिवसांचा पंढरपूर वारीचा (Pandharpur Wari) प्रवास सुखकर व्हावा याकरिता आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि फेसबूकच्या(Facebook) माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रिटिंग्स! आषाढी वारी मध्ये माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान; कशी आणि कोणी सुरू केली प्रथा?

माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार्‍या वारकर्‍यांसाठी खास शुभेच्छापत्र

हेचि व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास॥

पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरी॥

Pandharpur Wari 2019 (File Photo)

धरलिया वाट मुखी एक नाम ।

किती गुण गाऊ विठोबाचे ॥

Pandharpur Wari 2019 (File Photo)

पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज

तेणे त्रिभुवनी होईन सरता । नलगे पुरुषार्था मुक्‍तिवारी

Pandharpur Wari 2019 (File Photo)

पाऊले चालती पंढरीची वाट

Pandharpur Wari 2019 (File Photo)

यंदा आषाढी एकादशी 12 जुलै 2019 दिवशी आहे. दरवर्षी येणार्‍या चार वारींपैकी म्हणजेच आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी एकादशी सोहळ्यापैकी आषाढी एकादशी ही महायात्रा असते.