Happy Mother’s Day 2024 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Messages, Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे आईला द्या 'मदर्स डे'च्या खास शुभेच्छा!
तुम्ही देखील Messages, Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे तुमच्या आईला 'मदर्स डे'च्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
Happy Mother’s Day 2024 HD Images: प्रत्येक आई आपल्या मुलाचे संगोपण अत्यंत प्रामाणिक आणि प्रेमाने करत असते. आईच्या या समर्पणाचा सन्मान करण्यासाठी जगभरात मातृदिन साजरा केला जातो. आई ही प्रत्येकासाठी खास व्यक्ती असते जिच्याकडून मूल त्याच्या आयुष्यातील सुरुवातीचे गुण शिकते. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा 12 मे ला जागतिक मातृदिन (World Mother's Day 2024) साजरा करण्यात येणार आहे.
मदर्स डे (Mother’s Day 2024) ची उत्पत्ती प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांकडून झाली. ज्यांनी रिया आणि सायबेले या मातृदेवता यांच्या सन्मानार्थ हा सण साजरा केला. याला मदरिंग संडे असेही म्हणतात. जागतिक मातृदिनानिमित्त लोक आपल्या आईला सोशल मीडियावर खास शुभेच्छा पाठवतात. तुम्ही देखील Messages, Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे तुमच्या आईला 'मदर्स डे'च्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात अमेरिकन महिला ॲना जार्विस यांनी केली होती. तथापि, मदर्स डे साजरा करण्याची औपचारिक सुरुवात 9 मे 1914 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी केली होती. त्यावेळी अमेरिकन संसदेत कायदा करून दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून अमेरिका, युरोप आणि भारतासह अनेक देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाऊ लागला.