Veer Savarkar Punyatithi 2024 Messages: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त Wishes, Whatsapp Status शेअर करून करा त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन!
Veer Savarkar Punyatithi 2024 Messages: स्वातंत्र्यलढ्यातील नायक, महान क्रांतिकारक, विचारवंत, लेखक, कवी, वीर सावरकरांचा (Veer Savarkar) जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिकजवळील भगूर या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. हिंदू राष्ट्रवादाची राजकीय विचारधारा 'हिंदुत्व' विकसित करण्याचे मोठे श्रेय सावरकरांना जाते. धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यासाठी चळवळी सुरू केल्या. त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानात उपयुक्ततावाद, बुद्धिवाद, सकारात्मकतावाद, मानवतावाद, वैश्विकतावाद, व्यावहारिकता आणि वास्तववाद हे घटक होते. हिंदू महासभेचा ते प्रमुख चेहरा होते.
वीर सावरकर 1937 ते 1943 या काळात हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. फेब्रुवारी 1966 पासून सावरकरांनी अन्न, पाणी आणि औषधे घेणे सोडले. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले. वीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त Wishes, Whatsapp Status, HD Images शेअर करून त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करण्यासाठी खालील मेसेज डाऊनलोड करा. (विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त Images, Wishes, Whatsapp Status शेअर करून करा स्वातंत्र्यवीराच्या स्मृतिस विनम्र अभिवादन!)
स्वातंत्र्यलढ्यातील नायक, महान क्रांतिकारक,
विचारवंत, लेखक, कवी, ओजस्वी वक्ता
आणि दूरदर्शी विनायक दामोदर सावरकर जी
यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
राष्ट्रभक्तीची धगधगती ज्वाळा, अखंड हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्ते,
भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि हिंदुतेजसुर्य
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रनेते, विचारवंत, तत्त्वज्ञ
स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
वीरतेचे मूर्तिमंत, भारतमातेचे सुपुत्र लेखक,
कवी आणि निर्भय स्वातंत्र्यसैनिक
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
खरे देशभक्त, अनुकरणीय युगद्रष्टा,
अद्वितीय स्वातंत्र्य सेनानी
वीर सावरकर यांना
पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन!
स्वातंत्र्य संग्रामचा अमर सेनानी,
स्वातंत्र्य वीर सावरकरांना
पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!!
हा देश नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहिल.
वीर सावरकर यांनी 1904 मध्ये अभिनव भारत नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन केली. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर त्यांनी पुण्यात परदेशी कपडे जाळले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्येही ते देशभक्तीने भरलेली दमदार भाषणे देत असत. बाळ गंगाधर टिळक यांच्या मान्यतेवरून त्यांना 1906 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती मिळाली. त्यांचे अनेक लेख इंडियन सोशियोलॉजिस्ट आणि तलवार या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले, जे नंतर कलकत्त्याच्या युगांतर पत्रातही प्रकाशित झाले. सावरकरांवर रशियन क्रांतिकारकांचा जास्त प्रभाव होता.