Bhagwan Krishna HD Images: 26 ऑगस्ट रोजी देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा (Shri Krishna Janmashtami 2024) उत्सव पार पडणार आहे. या दिवशी बाळ गोपाळ श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. या दिवशी लोक कान्हाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून मथुरेला पोहोचतात. याशिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमीला सर्व कृष्ण मंदिर आणि घरांमध्ये श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते. या मंदिरात, जन्माष्टमीच्या संध्याकाळी आरतीनंतर, कृष्णाचा अभिषेक केला जातो. या मंदिरात भगवान बांकेबिहारी म्हणजेच श्रीकृष्ण त्रिभुज मुद्रेत उभे आहेत.
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी देशभरातील कृष्णाची मंदिरं सजवली जातात. तसेच या दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील भगवान कृष्णाच्या HD Images व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेऊन जन्माष्टमी साजरी करू शकता. यासाठी तुम्ही भगवान कृष्णाच्या खालील एचडी ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Janmashtami 2024 Quotes In Marathi: श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा शेअर करा कृष्ण मुरारीचे प्रेरणादायी कोट्स)
गोपाळ कृष्णाचे खास एचडी फोटोज -
सध्या वृंदावन आणि मथुरेमध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. तसेच याठिकाणी उत्सवासाठी मंदिराची सजावटीचं काम सुरू आहे. देशभरातून अनेक भाविक मथुरा आणि वृंदावनच्या दिशेने बाके बिहारीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.