Shaheed Diwas 2023 HD Images: शहीद दिनानिमित्त भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना Messages, Greetings, SMS द्वारे करा त्रिवार अभिवादन!
शहीद दिनानिमित्त भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना Wishes, Messages, Greetings, SMS, Images च्या माध्यमातून अभिवादन करण्यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
Shaheed Diwas 2023 HD Images: भारतात दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन (Shaheed Diwas 2023) साजरा केला जातो. शहीद दिनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली वाहिली जाते. कारण, याच दिवशी त्याला फाशी देण्यात आली होती. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोर तुरुंगात ब्रिटीश शासकांनी फाशी दिली होती.
या दिवशी ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांच्या शौर्याचा आणि वचनबद्धतेचा सन्मान केला जातो. 23 मार्च व्यतिरिक्त ज्या दिवशी महात्मा गांधी यांची हत्या झाली, 30 जानेवारी हा दिवस देखील शहीद दिन म्हणूनही साजरा केला जातो. 23 मार्च रोजी साजरा होणारा शहीद दिन हा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांच्या बलिदानाचे स्मरण करून साजरा केला जातो. शहीद दिनानिमित्त भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना Wishes, Messages, Greetings, SMS, Images च्या माध्यमातून अभिवादन करण्यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
भारतमातेचे सुपुत्र, महान क्रांतिकारी
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू
यांना शहीद दिनी विनम्र अभिवादन!
शहीद दिनानिमित्त
सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू
या महान क्रांतीविरांना विनम्र अभिवादन!
23 मार्च शहीद दिनानिमित्त
सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू
या महान क्रांतीविरांना त्रिवार अभिवादन!
महान क्रांतिकारी
सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू
क्रांतीविरांना शहीद दिनानिमित्त त्रिवार अभिवादन!
शहीद दिनानिमित्त
सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू
या महान क्रांतीविरांना शतशः नमन!
भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील लायलपूर येथे झाला होता. भगतसिंग हे त्यांचे सहकारी राजगुरू, सुखदेव, आझाद आणि गोपाल यांच्यासोबत लाला लजपत राय यांच्या हत्येसाठी लढले. भगतसिंग आपल्या साहसाने तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले. आजही तरुण त्यांना आपला नायक मानतात. भगतसिंग यांनी त्यांच्या साथीदारांसह 8 एप्रिल 1929 रोजी "इन्कलाब झिंदाबाद" च्या घोषणा देत केंद्रीय विधानसभेवर बॉम्ब फेकला. त्यासाठी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि 23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली.