Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2022: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त Messages, Images, WhatsApp Status, Facebook च्या माध्यमातून शेअर करा त्यांचे खास Quotes
सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त Messages, Images, WhatsApp Status, Facebook च्या माध्यमातून तुम्ही खालील ईमेज शेअर करून त्यांचे खास विचार आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता.
Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2022: सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे योद्धे, दूरदर्शी राजकारणी, आदरणीय समाजसेवक होते. त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणूनही ओळखले जाते. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री झाले. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यलढ्यात जनतेला भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेण्याची प्रेरणा दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार समाजासाठी, युवकांसाठी, देशासाठी, आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आज सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार या देशातील नेत्यांना तसेच प्रत्येक नागरिकाला माहित असणे आवश्यक आहे.
आपण फक्त त्यांची जयंती साजरी करून जमणार नाही. त्यापेक्षा या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला सरदार पटेलांच्या विचारांची जाणीव करून दिली पाहिजे. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त Messages, Images, WhatsApp Status, Facebook च्या माध्यमातून तुम्ही खालील ईमेज शेअर करून त्यांचे खास विचार आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता.
सरदार वल्लभाई पटेल यांचे मराठी कोट्स -
जेव्हा जनता एक होते, तेव्हा अत्यंत क्रूर राजवटही त्यांच्यासमोर टिकू शकत नाही. त्यामुळे जात, धर्म, उच्च-नीच हा भेदभाव विसरून सर्वांनी एक व्हा. - सरदार वल्लभभाई पटेल
तुमचा अपमान सहन करण्याची कला तुम्हाला अवगत असावी. -सरदार वल्लभभाई पटेल
अविश्वास हे भीतीचे मुख्य कारण आहे. - सरदार वल्लभभाई पटेल
जर तुमच्यात शक्ती कमी असेल तर विश्वास काही उपयोगाचा नाही. कारण महान ध्येय साध्य करायचे असेल तर शक्ती आणि विश्वास दोन्ही असणे आवश्यक आहे. - सरदार वल्लभभाई पटेल
कर्तव्यदक्ष माणूस कधीही निराश होत नाही. म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात आणि तुमचे कर्तव्य करत राहाल, तोपर्यंत तुम्हाला त्यात पूर्ण आनंद मिळेल. - सरदार वल्लभभाई पटेल
जोपर्यंत आपले अंतिम ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर अधिक दु:ख सहन करण्याची ताकद आपल्यात आली पाहिजे, हाच खरा विजय आहे. - सरदार वल्लभभाई पटेल
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. 31 ऑक्टोबरला देशभरात सरदार पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. देशात हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देखील साजरा केला जातो.
(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2022 06:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

