Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2023 Quotes: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त Images, Messages, WhatsApp Status, Facebook द्वारे शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार
Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2023 Quotes: यंदा 31 ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची 146 वी जयंती साजरी करण्यात येते आहे. हा दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) म्हणून साजरा केला जातो. सरदार पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. सरदार पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अभूतपूर्व योगदान दिले. ज्यानंतर भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून सरदार पटेल यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. सरदार पटेल पंतप्रधान व्हावेत अशी काँग्रेसमधील जवळपास प्रत्येकाची इच्छा होती. पण महात्मा गांधींच्या केवळ विनंतीवरून त्यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण राष्ट्राला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त Images, Messages, WhatsApp Status, Facebook द्वारे तुम्ही त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करू शकता.
कठीण प्रसंगी, भ्याड लोक निमित्त शोधतात, तर धाडसी लोक या परिस्थितीतून मार्ग काढतात.
- सरदार वल्लभभाई पटेल
शक्ती नसताना विश्वास निरुपयोगी आहे. कोणतेही महान कार्य करण्यासाठी विश्वास आणि शक्ती या दोन्ही आवश्यक असतात.
- सरदार वल्लभभाई पटेल
जेव्हा जनता एक होते, तेव्हा अत्यंत क्रूर राजवटही त्यांच्यासमोर टिकू शकत नाही. त्यामुळे जात, धर्म, उच्च-नीच हा भेदभाव विसरून सर्वांनी एक व्हा.
- सरदार वल्लभभाई पटेल
कर्तव्यदक्ष माणूस कधीही निराश होत नाही. म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात आणि तुमचे कर्तव्य करत राहाल, तोपर्यंत तुम्हाला त्यात पूर्ण आनंद मिळेल.
- सरदार वल्लभभाई पटेल
जोपर्यंत आपले अंतिम ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर अधिक दु:ख सहन करण्याची ताकद आपल्यात आली पाहिजे, हाच खरा विजय आहे.
- सरदार वल्लभभाई पटेल
तुमचा अपमान सहन करण्याची कला तुम्हाला अवगत असावी.
- सरदार वल्लभभाई पटेल
2014 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. पेशाने वकील असलेले सरदार पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. ते विशेषतः खेडा सत्याग्रहासाठी ओळखले जातात. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते.