Maghi Ganesh Jayanti 2025 Messages In Marathi: माघी गणेश जयंती निमित्त Wishes, Images, WhatsApp Status द्वारे द्या गणेश भक्तांना खास शुभेच्छा!

माघी गणेश जयंतीनिमित्त गणेश भक्त एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील गणेश जयंती निमित्त खालील Wishes, Images, WhatsApp Status द्वारे गणेश भक्तांना खास शुभेच्छा देऊ शकता.

Maghi Ganesh Jayanti 2025 Messages In Marathi: माघी गणेश जयंती निमित्त Wishes, Images, WhatsApp Status द्वारे द्या गणेश भक्तांना खास शुभेच्छा!
Maghi Ganesh Jayanti 2025 Messages In Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

Maghi Ganesh Jayanti 2025 Messages In Marathi: हिंदू धर्मात कोणत्याही विधीपूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जातो. हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान गणेशाचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला झाला होता. या वर्षी माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2025) 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाईल. बरेच लोक माघी गणेश जयंतीची मोठ्या उत्सुकतेने याची वाट पाहत असतात. वेगवेगळ्या प्रदेशात हा सण इतर नावांनी ओळखला जातो. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशात याला तिलो चौथ किंवा संकट चौथी म्हणतात.

माघी गणेश जयंती हा प्रामुख्याने भारताच्या पश्चिम भागात, विशेषतः महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात साजरा केला जाणारा सण आहे. माघी हे नाव हिंदू चंद्र कॅलेंडरमध्ये माघ महिन्यात होणाऱ्या उत्सवाला सूचित करते. हा दिवस भाद्रपद महिन्यात होणाऱ्या गणेश चतुर्थीपेक्षा वेगळा आहे. माघी गणेश जयंतीनिमित्त गणेश भक्त एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील गणेश जयंती निमित्त खालील Wishes, Images, WhatsApp Status द्वारे गणेश भक्तांना खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Maghi Ganesh Jayanti 2025 Date: माघी गणेश जयंतीची तारीख, महत्व आणि पूजा विधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती)

माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा - 

सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त तुमच्या आगमनाची,

कारण, चतुर्थी आमच्या गणेशाची

माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

Maghi Ganesh Jayanti 2025 Messages In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या

पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

Maghi Ganesh Jayanti 2025 Messages In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

गणपती बाप्पा मोरया

सर्वांना माघी गणेश जयंतीच्या

हार्दिक शुभेच्छा

देवा सर्वाना सुखी समाधानी

आनंदी ठेव…

शुभ सकाळ !

Maghi Ganesh Jayanti 2025 Messages In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

सर्वांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”

गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

Maghi Ganesh Jayanti 2025 Messages In Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

ऊँ गं गणपतये नमो नमः

शुभ सकाळ

सर्व गणेश भक्तांना माघी गणेश

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…

गणपती बाप्पा मोरया !

Maghi Ganesh Jayanti 2025 Messages In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

गणेश जयंती हा गणेशाच्या जन्माच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. भगवान गणेश हे ज्ञान, समृद्धी आणि अडथळे दूर करण्याचे प्रतीक आहे. हा सण जीवनात भक्ती आणि नम्रतेचे महत्त्व देखील अधोरेखित करतो.

(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2025 06:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).