Rajmata Jijau Punyatithi 2025 HD Images: राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीच्या दिवशी WhatsApp Status, Quotes द्वारे करा माँ साहेबांना विनम्र अभिवादन!
यंदा 20 जून रोजी जिजाऊंची तिथीनुसार पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही खालील WhatsApp Status, Quotes द्वारे माँ साहेबांना विनम्र अभिवादन करू शकता.
Rajmata Jijau Punyatithi HD Images: राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी इ.स. 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. जिजाबाईंचा विवाह सुलतानच्या सैन्यातील सर्वात शूर सेनापती शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यानंतर त्या पुण्यात वास्तव्यास आल्या. निजामाने जिजाबाईंचे वडील लखोजीराजे आणि त्यांच्या तीन भावांना राजदरबारात नि:शस्त्र बोलावून ठार मारले. या निर्दयी घटनेने जिजाबाईंचे हृदय पूर्णपणे पिळवटले होते. त्यांचे माहेरचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, परंतु त्यांनी 'स्वराज्य'ची तळमळ सोडली नाही.
जिजाबाई भवानीमतेला कळकळीने प्रार्थना करायच्या, 'दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी, मला श्रीरामांसारखा पुत्र किंवा देवी दुर्गासारखी कन्या द्या, जी शत्रूंवर विजय मिळवेल.' अखेर जिजाऊंची ही इच्छा पूर्ण झाली आणि त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्वराज्याचे स्पप्न दाखवले. तसेच शिवरायांनी जिजाऊंचे हे स्वप्न सत्यात उतरवले. यंदा 20 जून रोजी जिजाऊंची तिथीनुसार पुण्यतिथी (Rajmata Jijau Punyatithi 2025) साजरी करण्यात येणार आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही खालील WhatsApp Status, Quotes द्वारे माँ साहेबांना विनम्र अभिवादन करू शकता.
राजमाता जिजाऊ माँ साहेब
यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!

राजमाता जिजाऊ यांना
पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन!

राजमाता जिजाऊ यांना
पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन!

राजमाता जिजाऊ यांना
पुण्यतिथी निमित्त कोटो कोटी प्रणाम!!

राजमाता जिजाऊ यांच्या
पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस वंदन!

जिजाऊंनी रामराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले होते. लहानपणापासूनच जिजाबाई शिवाजीला श्रीराम, मारुती, श्रीकृष्ण, महाभारत आणि रामायणातील कथा सांगत असे. अशा प्रकारे, जिजाऊंनी राष्ट्र आणि धर्माप्रती भक्तीचे बीज पेरून शिवबाला एक आदर्श शासक बनवले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2025 06:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

