New Year Resolution 2021: नवीन वर्षाकरिता गृहिणी, बच्चे कंपनीसाठी नवीन वर्षासाठी काही हटके संकल्प

तसेच तुमचे 2021 हे वर्ष देखील खूप चांगले जाईल

New Year Resolution 2021 (Photo Credits: pixabay)

नवीन वर्ष सुरु होण्याआधी नववर्षाचे अनेक प्लान्स तयार होतात. यात कुठे पिकनिकला जायचे, काय करायचे, हे सर्व ठरविण्यासोबत एक असा उपक्रम आवर्जून केले जातो तो म्हणजे 'संकल्प' (New Year Resolution 2021). ज्याला आपण रिजोल्युशन असेही म्हणतो. नववर्षात असा काही संकल्प करायचा जो पाहून, ऐकून तुमच्या जवळच्या लोकांना धक्काच बसेल याकडे अनेकांचा कल असतो. याआधी संकल्प म्हटला की स्वत:मध्ये काहीतरी सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टीने केला जायचा मात्र सध्या संकल्प करणे म्हणजे एक प्रकारची स्पर्धा सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत घरासाठी राब-राब राबणा-या गृहिणींना (Housewives) तसेच छोट्या मुलांना (Small Kids) कोणते असे संकल्प आहेत जे आनंद देतील हे ठरवणं थोडं अवघड आहे.

तुम्हाला पडलेल्या या शंकांचे निरसन करण्यासाठी आम्ही आज तुम्हाला छान संकल्प सांगणार आहोत जे 2021 वर्षात तुम्हाला खूप कामी येतील. तसेच तुमचे 2021 हे वर्ष देखील खूप चांगले जाईल.हेदेखील वाचा- January 2021 Festival Calendar: जानेवारी 2021 महिन्यातील 'हे' दिवस महत्त्वाचे; जाणून घ्या सण आणि उपवासाच्या तारखा

गृहिणींसाठी संकल्प:

1. स्वत:साठी वेळ द्या

गृहिणी म्हटलं की घरच्या जबाबदा-या पार पाडता पाडता स्वत:साठी वेळ मिळत नाही. यासाठी महिलांनी दिवसाचे वेळापत्रक बनवून यात स्वत:साठी वेळ द्या. ज्या वेळेत तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. यात पुस्तक वाचणे, नृत्य, गायन वा अन्य तुमचे आवडीचे छंद असू शकतात.

2. महिन्यातून एकदा तरी पिकनिक ला जा

शक्य असल्यास कमी बजेटमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पिकनिकला जा. ज्यामुळे तुम्हाला घरापासून थोडा चेंज मिळेल.

3. आरोग्याची काळजी घ्या

यात तुम्ही व्यायाम करण्यासोबत वेळोवेळी तुमची आरोग्य तपासणी करुन घ्या. ज्यामुळे शरीरासंबंधी काही तक्रारी असतील तर त्या समजतील.

लहान मुलांसाठी नववर्षाचे संकल्प

1. झाडे लावा, झाडे जगवा

लहान मुलांनी आपल्या भविष्याचा विचार स्वत: करण्यास सुरुवात करुन त्यासाठी नववर्षात झाडे लावून त्याला नियमितपणे पाणी घालून ती जगवा. झाडे आपल्याला प्राणवायू देतात. त्यामुळे हा ऑक्सिजन मिळविण्याकरिता आपल्या आसपासच्या परिसरात झाडे लावा.

2. घरच्या कामात आईला मदत करा.

आपली आई आपल्यासाठी खूप राबत असते. अशा परिस्थितीत आपला त्याचा छोटासा हिस्सा बनवून तिच्या कामाचे ओझे हलके करण्यासाठी तिला घरच्या कामात मदत करा. त्यासाठी स्वावलंबी बनून स्वत:ची कामे स्वत: करा.

3. शिक्षणासोबत आपले आवडीचे छंद जोपासा

केवळ अभ्यास एके अभ्यास न करता आपले छंद जोपावे. ज्यामुळे तुमच्या मनावरील तणाव कमी होईल.

नववर्षाचे हे चांगले आणि तुमच्यात सकारात्मक बदल घडविणारे संकल्प अवश्य करा. ज्यामुळे नक्कीच तुम्हाला येणारे नववर्ष सुख, समृद्धी आणि निरोगी जाईल.