Subhash Chandra Bose Jayanti 2020: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांच्या आयुष्याविषयी ही रोचक सत्ये जाणून घ्या

आजही त्यांच्या मृत्यासहित अनेक रोचक सत्ये ही गूढ आहेत. यातील काही उदाहरणे आज आपण पाहणार आहोत

सुभाष चंद्र बोस जयंती 2019 (Wikimedia Commons)

Netaji Subhash Chandra Bose Jayanti 2020:  भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नावाजलेले क्रांतिकारक आणि आझाद हिंद सेनेचे (Azad Hind  Sena) सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांची यंदा 23 जानेवारी रोजी 123 वी जयंती आहे. दुसरे महायुद्ध सुरू असताना, इंग्रजांशी लढण्यासाठी, त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. यावेळी त्यांनी दिलेला जय हिंद ची घोषणा ही आज भारताची राष्ट्रीय घोषणा बनली आहे. तसेच, 'तुम मुझे खून दो, मै तुम आझादी दूंगा' या घोषणेचे स्वातंत्र्य लढ्यात अतीव महत्व आहे. नेताजी बोस यांचा आयुष्यकाळ हा त्यांच्या कर्तृत्वामुळे स्मरणात राहण्यासारखा ठरला होताच पण त्यांच्या मृत्यूनंतरही भारताची राजकीय भूमी हादरून टाकली होती. आजही त्यांच्या मृत्यासहित अनेक रोचक सत्ये ही गूढ आहेत. यातील काही उदाहरणे आज आपण पाहणार आहोत... चला तर मग जाणून घेऊयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यातील काही न ऐकलेली न वाचलेली वळणे..

Subhash Chandra Bose Jayanti 2020 Quotes: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे हे 5 प्रेरणादायी विचार बदलतील तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!

- नेताजी सुभाष चंद्र बोस हे त्यांच्या कुटुंबातील 9 वे आपत्य होते.

-नेताजी यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याआधी भारतीय सिव्हिल सेवेची सरकारी नोकरी केली होती. या परीक्षेत त्यांचा चौथा रँक होता. मात्र जालियनवाला बाग हत्याकांड नंतर त्यांनी न राहवून स्वान्त्र्याच्या लढाईत सक्रिय सहभाग घेतला.

-1921 ते 1941 दरम्यान नेताजी यांना तब्बल 11 वेळा भारतातील वेगवेगळ्या तुरुंगाची वारी करावी लागली होती. तर 1941 मध्ये त्यांना नजरबंदीत ठेवण्यात आले होते, इथून पळून त्यांनी रस्तामार्गे कोलकाता तिथून रेल्वेने पेशावर, तिथून थेट काबूल आणि तिथून जर्मनी गाठली होती. तिथे त्यांची अडॉल्फ हिटलरची भेट झाली, सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणणारा हिटलर हा पहिला व्यक्ती होता.

-1934 साली उपचारासाठी म्ह्णून नेताजी ऑस्ट्रियाला गेले होते, जिथे एमिली शेंकल नामक महिलेशी त्यांची ओळख झाली होती. ही महिला टायपिस्ट होती पुस्तक टाईप करण्याच्या कामानिमित्त त्यांची या महिलेशी ओळख झाली होती. पुढे 1942 साली त्या दोघांचा विवाह झाला .

-1943 मध्ये बर्लिन मध्ये राहत असताना नेताजी यांनी आझाद हिंद रेडियो आणि फ्री इंडिया सेंटर ची स्थापना केली होती.

- नेताजी यांनी जगातील पहिली महिला सैन्य दलाची फौज उभारली होती.

- नेताजी सुभाष चंद्र बोस हे महात्मा गांधी यांच्या विचारांशी अजिबात सहमत नव्हते, मात्र त्यांचे काय पाहून सर्वात आधी नेताजी यांच्याच गांधींना राष्ट्रपिता म्ह्णून संबोधले होते. त्यांच्या जहाल मतानुसार, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शांततेचा मार्ग कामी येणार नव्हता.

-नेताजी यांना दोन वेळेस भारतीय राष्ट्रीय कांग्रेस अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते. मात्र तरीही त्यांनी 1939 साली आपल्या पदाचा राजीनामा देऊन फॉरवर्ड ब्लॉक ही संघटना स्थापली होती.

-नेताजी यांच्या मृत्यूमागील कथा ही आजही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलेली नाही. जपान मधील एका हवाई दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते मात्र याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही इतकेच काय त्यांचे शव सुद्धा भारतात आले नव्हते.

-1992 साली नेताजी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आले होते जे काही वर्षांनी मागे घेण्यात आल होते.

Netaji Subhash Chandra Bose Quotes: नेताजी सुभासचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार Watch Video

महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. असे मानतात, की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते, तर कदाचित भारताची फाळणी न होता, भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अग्रगण्य असणाऱ्या अशा थोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज जयंती दिनी विनम्र अभिवादन!