Navratri 2022: नवरात्र उत्सवाची आज दुसरी माळ, जाणून घ्या आज कोणता रंग आणि दुर्गा मातेचं कुठलं रुप

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी नवदुर्गेच्या दुसऱ्या रूपाची म्हणजे माँ ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते.

कालपासून शारदेय नवरात्राला (Navratri 2022) सुरुवात झाली आहे. आज नवरात्राचा (Navratri) दुसरा दिवस. नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या (Durga Mata) नऊ वेगवेगळ्या रुपांना समर्पित केल्या जाते. आज नवरात्राची दुसरी माळ असून नवदुर्गेचे द्वितीय रुप स्वरुप ब्रम्हाचारिणी देवीला (Shailaputri Devi) समर्पित आहे. तसेच आजचा रंग लाल (White) आहे. नवरात्रीच्या  नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची भक्ती भावाने पूजा केल्या जाते. काही भाविक आपल्या घरी घटची स्थापना करत दुर्गा मातेची भक्ती भावाने पुजा करतात. नवरात्र हा उत्सव फक्त महाराष्ट्रातचं (Maharashtra) नाही तर संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. वेगवेगळ्या राज्यातील पध्दती वेगळ्या असल्या तरी विविधतेने हा उत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो.

 

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी, नवदुर्गेच्या दुसऱ्या रूपाची, माँ ब्रह्मचारिणीची (Bramhacharini) पूजा केली जाते. देवी ब्रम्हाचारिणी पांढर्‍या कपड्यांमध्ये (White Wearings) ती शांत आणि आनंददायी मुद्रेत उभी असते. तिच्या एका हातात जपमाला तर दुसऱ्या हातात कमंडल भांडे धरले असते. ब्रम्हाचारीणीचं (Bramhacharini) रुप मनाला शांतता आणि प्रसन्नता देणार असतं. हिंदू पुराणांनुसार देवी ब्रह्मचारिणीने भगवान शिवाला (Lord Shiva) संतुष्ट करण्यासाठी कठोर तपश्चर्या केल्याची आख्यायिका आहे. (हे ही वाचा:- Navratri 2022 Day 2 Colour Red: आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा जोनासचा लाल रंगातील आकर्षक लुक, पाहा फोटो)

 

ब्रह्मचारिणी मातेची पूजा केल्यास शांती आणि समृध्दी लाभते. तसेच अविवाहीत कण्यांनी ब्रम्हारणीची उपासना केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात. आजचा दिवस ब्रम्हाचारिणी मातेला समर्पित आहे. सिनेअभिनेत्यांसह राजकीय नेते देखील नवरात्री उत्सव मनोभावाने साजरा करताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ब्रम्हचारणी मातेचा व्हिडीओ पोस्ट करत देशवासियांना नवरात्रीच्या खास शुभेच्छा केल्या आहेत.

 

तसेच आजच्या दिवशी माता ब्रम्हचारणीच्या मंत्राचा जप केल्यास लाभ दायक ठरते:-

ॐ दधना करपद्मभ्यामक्षमाला कमंडलु

देवी प्रसीदतु मयी ब्रह्मचारिणीनुत्तमा

ओम देवी ब्रह्मचारिणीय नमः ॥