Narali Purnima Wishes 2021: नारळी पौर्णिमेनिमित्त मराठमोठे Messages, WhatsApp Status, Facebook Post शेअर करत द्या कोळी बांधवांना सणाच्या शुभेच्छा!
समुद्राला नारळ अर्पण करून हा समाज आपली कृतज्ञता व्यक्त करतात. वरूण हा समुद्राचा रक्षक समजला जातो.
Happy Narali Purnima Wishes 2021: समुद्र किनारी राहणारा कोळी समाज नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात. समुद्राला नारळ अर्पण करून हा समाज आपली कृतज्ञता व्यक्त करतात. वरूण हा समुद्राचा रक्षक समजला जातो. त्याच्या पूजनाने सारी संकट टळावी अशी कामना केली जाते. तर शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांसाठी महत्वाचा मानला जातो.
या दिवशी होड्याना रंगरंगोटी करून सजविण्यात येतात. काही ठिकाणी तर कोळी बांधवांकडून भव्य मिरवणुका देखील काढण्यात येतात, अशी प्रथा आहे. पावसाळा हा माश्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने कोळी बांधव या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावणी पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की, त्यानंतरच समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते. तर यंदाच्या नारळी पौर्णिमेनिमित्त मराठमोठ्या Wishes, Messages, WhatsApp Status, Facebook Post शेअर करत द्या कोळी बांधवांना सणाच्या शुभेच्छा!(Raksha Bandhan 2021 Messages in Marathi: रक्षाबंधन सणानिमित्त मराठी Wishes, Greetings, Images शेअर करुन साजरी करा यंदाची राखीपौर्णिमा!)
नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो, समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व कोळी बांधवांना
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोळीवारा सारा सजलाय गो,
कोळी यो नाखवा आयलाय गो…
मासळीचा दुष्काळ सरू दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण आज आला नारळी पौर्णिमेचा
सागरपुत्रांच्या आनंदाचा
दर्या राजा असे देव त्यांचा
रक्षणकर्ता तो सकलांचा!
सर्वांना नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
श्रद्धेचा नारळ अर्पूया सागराला
सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्रात नारळी पौर्णिमेदिवशी नाराळाचे विविध पदार्थ बनवले जातात. यामध्ये नारळी भात, नाराळाच्या वड्या असे गोडाधोडाचे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. श्रावण महिना हा समुद्रातील माश्यांचा प्रजनन काळ असतो म्हणून मासेमारी थांबविली जाते. मात्र, नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधव आपल्या होड्या समुद्रात उतरवून मासेमारी करण्यास सुरूवात करतात.