IPL Auction 2025 Live

Nag Panchami 2020 Date: नाग पंचमी दिवशी यंदा पूजा कशी कराल?

यंदा हा सण 25 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे.

Nag Panchami (Photo Credits: Instagram)

Nag Panchami 2020  Pujan:  हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या श्रावण महिन्याला (Shravan Maas)  व्रत वैकल्यांचा, सणांचा राजा म्हणून ओळखळा जातो. श्रावण महिन्यात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी (Nag Panchami).  श्रावण शुक्ल पंचमी दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. यंदा हा सण 25 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे. नागाप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी नागपंचमी साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात विविध पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते. ग्रामीण भागात नागपंचमीला नागाच्या वारूळाची पूजा केली जाते तर शहरी भागामध्ये पाटावरच नागाचे चित्र साकारून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे.

नागपंचमी तारीख आणि पूजा

नागपंचमी यंदा शनिवार, 25 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे. त्या दिवशी नागाला दूध -लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पातोळ्यांसारखे गोडाचे पदार्थ देखील बनवले जातात. अनेक जणी नागाला बंधूराज समजत नागपंचमी दिवशी उपवास करून देखील हे व्रत करतात. Shravan Month 2020 in Maharashtra:महाराष्ट्रात श्रावण महिना 21 जुलै पासून; श्रावणी सोमवार, मंगळागौर ते महत्त्वाच्या सणांच्या पहा तारखा.

शहरामध्ये नागाचे चित्र हळद किंवा रक्तचंदनाने साकारून त्याची प्रतिकात्मक पूजा करण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी जिवंत सापाऐवजी मातीपासून बनवलेल्या नागाची प्रतिकृती पूजली जाते. महिला वर्गामध्ये नागपंचमीचं विशेष आकर्षण असते. या सणानिमित्त महिला, मुली हातावर मेहंदी काढतात. नागाच्या वारूळाची पूजा करून झिम्मा, फुगडी सारखे खेळ एकत्र येऊन खेळतात.

महाराष्ट्राच्या काही भागांत नागपंचमीच्या दिवशी अहिंसेची शिकवण रूजवण्यासाठी काहीही चिरू नये, कापू नये असे सांग़ितले जाते. त्यामुळे हा नियम जेवणामध्येही लागू केला जातो. शेतकरी वर्ग देखील नागपंचमीला शेतीच्या कामांमध्ये नांगरणी टाळतात.

(टीप:  सदर लेख हा केवळ माहिती देण्याच्या हेतूने लिहलेला आहे. लेटेस्टली मराठी कोणत्याही धार्मिक, अंधश्रद्धांना चालना देणार्‍या गोष्टींचा पुरस्कार करत नाही.)