Mumbaicha Raja 2026 Fake Viral Photos: मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती च्या यंदाच्या रूपाचे AI निर्मित फोटो वायरल; मंडळाने केले भाविकांना महत्त्वाचं आवाहन

गणेशगल्लीचा गणपती यंदा वैष्णव सांप्रदाय दर्शविणार्‍या वारी च्या सजावटीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे बाप्पाचं नेमकं रूप कसं असेल? तो विठूरायाच्या रूपात असेल का? असे अनेक कयास लावले जात आहेत.

Mumbaicha Raja 2026

मुंबई मध्ये जुलै महिना सुरू झाला की आपोआपचं गणेशभक्तांना ब्बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. त्याच्या आगमनाच्या तयारीचे दिवस सुरू होता. मुंबईमध्ये घरगुती गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव देखील मोठ्या धामधूमीच्या वातावरणामध्ये साजरा केला जातो. मुंबईचा राजा (Mumbaicha Raja) ओळख असलेल्या लालबाग मधील गणेशगल्लीच्या बाप्पाचा देखील गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला. तरूणाईच्या गर्दीमध्ये हा पाद्यपूजन सोहळा संपन्न होताना यंदाच्या सजावटीची देखील घोषणा झाली. गणेशगल्लीचा बाप्पा यंदा वारीच्या वातावरणामध्ये विराजमान होणार आहे. मात्र या घोषणेनंतर सोशल मीडीयात बाप्पाचं यंदाचं रूप कसं असेल? याची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी AI च्या मदतीने फोटो निर्मिती करत बाप्पाचं रूप पोस्ट केले आहे. सध्या गणेशगल्लीचा गणपती 2026 च्या नावाने अनेक रूपांमधील फोटो वायरल होत आहेत. दरम्यान लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ (𝗟𝗮𝗹𝗯𝗮𝘂𝗴 𝗦𝗮𝗿𝘃𝗮𝗷𝗮𝗻𝗶𝗸 𝗨𝘁𝘀𝗮𝘃 𝗠𝗮𝗻𝗱𝗮𝗹) या गणेशगल्लीच्या बाप्पाच्या अधिकृत मंडळाने वायरल होत असलेल्या फोटोंचा दावा खोडून काढला आहे.

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ कडून करण्यात आलेले आवाहन

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbaicha Raja, Ganeshgalli (@raja_mumbaicha)

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ हे मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती चे अधिकृत मंडळ आहे. इंस्टाग्राम वर पोस्ट करत त्यांनी सोशल मीडीयात वायरल होत असलेले फोटोज अधिकृत नसल्याचं जाहीर केले आहे. चाहत्यांच्या कल्पकतेचा आम्ही आदर करतो पण ते फोटो अधिकृत समजू नये. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचं मोहक रूप आपल्यासमोर येईल असे त्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीचं यंदाचं 99 वं वर्ष आहे. शतकपूर्तीकडे प्रवास करणारे हे मंडळ दरवर्षी आकर्षक सजावटीमुळेही कायम प्रकाशझोकात असते.

मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती चे यंदाचं अधिकृत रूप कधी पहायला मिळतं?

मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती चे अधिकृत मीडीयाच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या  आधी 1-2 दिवस पहायला मिळतं. मंडळाच्या अधिकृत सोशल मीडीया हॅन्डेल वरून त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग, फोटोज शेअर केले जातात. मोजक्याच निमंत्रितांना यावेळेस मंंडळात प्रवेश दिला जातो. मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून तो भाविकांसाठी पुढील दहा दिवस खुला करण्यात येतो. यंदा गणेश चतुर्थी 14 सप्टेंबरला आहे, त्यामुळे 23 सप्टेंबर पर्यंत भाविक बाप्पाच्या दर्शनाला येऊ शकतात.

यंदा गणेशगल्लीच्या बाप्पाची मूर्ती मूर्तिकार आकाश तिरमल साकारणार असून आकर्षक देखाव्याची जबाबदारी कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्याकडे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement