Kala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण

यंदा या महोत्सवाचे 21 वे पर्व साजरे होत आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत या महोत्सवला सुरुवात होणार असून 9 फेब्रुवारीला या महोत्सवाची समाप्ती होणार आहे.

Kala Ghoda Art Festival 2020 (PC - facebook)

Kala Ghoda Art Festival 2020: प्रत्येकवर्षी मुंबईकरांसाठी पर्वणी ठरणारा 'काळा घोडा कला महोत्सव' हा कलाकारांसाठी पर्वणी असतो. यंदा या महोत्सवाचे 21 वे पर्व साजरे होत आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत या महोत्सवला सुरुवात होणार असून 9 फेब्रुवारीला या महोत्सवाची समाप्ती होणार आहे. या महोत्सवासाठी देशविदेशातून कलाकारमंडळी येतात. हा महोत्सव म्हणजे कला साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे. लोकप्रिय काळा घोडा महोत्सवात संगीत, नृत्य, साहित्य, नाटक अशा अनेक कलांचे विविधांगी दर्शन घडते. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईला भेट देणार असाल, तर काळा घोडा फेस्टिवलला नक्की भेट द्या. 9 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलला भेट दिल्यानंतर तुम्हाला नक्की आनंद मिळेल. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

काळा घोडा महोत्सव साजरा होण्यास 1999 पासून सुरुवात झाली. या महोत्सवामध्ये कलाकारांकडून विविध कला सादर केल्या जातात. या महोत्सवामध्ये हाताने बनवलेल्या विविध गोष्टींची विक्री केली जाते. दक्षिण मुंबईमध्ये पार पडणाऱ्या काळा घोडा महोत्सवाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे लोकनृत्य आणि विविध शास्त्रीय नृत्यकला. या महोत्सवात भरणारी वेगवेगळी प्रदर्शने लोकांची मनं जिंकून घेतात. (हेही वाचा - Haldi Kunku Rangoli Designs: हळदी कुंकू कार्यक्रमा दिवशी पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी आकर्षक आणि सोप्या रांगोळ्या!)

विविध प्रांतातील कपडे, दागिने, हातमागाच्या वस्तू आदी वस्तूंनी काळा घोडा परिसर फुलून जातो. मुंबईकरांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच येथे खरेदीसाठी गर्दी होते. काळा घोडा महोत्सव कलाकारांसाठी विशेष महत्त्वाचा ठरतो. या महोत्सवात अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. आठवडाभर चालणारा हा महोत्सव कलेच्या उपासकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.