मुंबईतील 'या' लोकप्रिय गणपती मंडळांना नक्की भेट द्या !

हा गणपती सार्वजनिक असूनही केवळ पाचच दिवस विराजमान होतो

2016 Lalbaghcha Raja (Photo Credits: Official Website)

गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2019) हा हिंदू धर्मातील एक सार्वजनिक उत्सव (Festivals) आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी (Lokmanya Tilak) या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून पारंपारिक स्वरूपात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे वर्षानुवर्ष अनेकजण हमखास काही मंडळांना भेट देतात. देशा- परदेशातून काही मंडळी खास गणेशमूर्ती पाहण्यासाठी येतात.

  • लालबागचा राजा

लालबागचा राजा हे मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक आहे. यावर्षी लालबागच्या राजाचे ८६वे वर्ष आहे. 'नवसाला पावणारा' अशी या गणपतीची ख्याती आहे. भाविक तासन तास लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहतात. सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटींनाही लालबागच्या राजाचे खास आकर्षण असते. प्रत्येक वर्षी लालबागच्या राजाच्या देखाव्यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्तम सजावट केली जाते.

कसे पोहचाल ?

मुंबईत ट्राफिक टाळायचा एक पर्याय म्हणजे रेल्वेप्रवास. त्यामुळे लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायचे असल्यास मध्य रेल्वेच्या करी रोड स्टेशनवर उतरा. स्टेशनवरून लालबागचा राजा अवघ्या काही मिनिटांत पायी पोहचू शकता.

  • गणेशगल्ली

लालबागच्या राजाच्या अगदी शेजारीच गणेशगल्लीचा गणपती आहे. गणेशगल्लीचा गणपती हा 'मुंबईचा राजा' म्हणून ओळखला जातो. यावर्षी या गणेश  मंडळाने भाविकांना आकर्षित करण्यासाठी राम मंदिर उभारले आहे.

कसे पोहचाल ?

बेस्ट बस, टॅक्सी किंवा करी रोडवरून अगदी चालत जाऊन गणपतीचे दर्शन घेऊ शकतात. २४ तास गणपती दर्शन सुरू असल्याने रात्रीच्या वेळीही गणपती मंडळांना भेट देण्याची मज्जा काही औरच असते.

  • चिंचपोकळीचा चिंतामणी

मुंबईत सर्वात जुन्या मंडळांपैकी प्रामुख्याने खास आकर्षण असलेला एक गणपती म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी. यंदा या सार्वजनिक मंडळांचे १०० वे वर्ष आहे. शिस्तप्रिय मंडळ अशी याची ख्याती आहे. या गणपतीचे आगमन अधिक आकर्षित ठरते . यादरम्यान अनेक पथक ढोल वाजवत गणेशाचे स्वागत करतात. प्रदर्शन करत असतात.

 

कसे पोहचाल ?

चिंचपोकळी स्टेशनवरून तुम्ही पायी चालत जाऊन चिंतामणीचे दर्शन घेऊ शकता.

  •  जीएसबी गणपती

मुंबईतील श्रीमंत आणि सोन्याने मढलेला गणपती म्हणून जीएसबी गणपतीची ख्याती आहे. गौड सारस्वत समाजाचा हा गणपती सार्वजनिक असला तरीही केवळ पाच दिवसच असतो. त्यामुळे शक्यतो पहिल्या दोन दिवसातच या गणपतीचे दर्शन घ्या. वडाळ्याच्या जीएसबी गणपतीचे दर्शन मुखदर्शन आणि थेट दर्शन अशा दोन स्वरूपात खुले असते.

कसे पोहचाल ?

दादर, माटुंगाहून बेस्ट बस किंवा टॅक्सीने तुम्ही वडाळ्यात येऊ शकता.रेल्वेच्या हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल स्टेशनवरून तुम्ही अगदी चालत काही मिनिटांत वड्याळ्याच्या जीएसबी गणपतीचे दर्शन घेऊ शकता.

  • केशवजी नाईक चाळ

केशवजी नाईक चाळ हा मुंबईतील पहिला आणि सर्वात जुना गणपती आहे. सुमारे १२६ वर्ष उलटून गेलेला हा गणपती मुंबईत लोकप्रिय गणपतींपैकी एक आहे. या गणपती मंडळाला लोकमान्य टिळकांनीही भेट दिली आहे. हा गणपती गिरगावात आहे.

  • अंधेरीचा राजा

१९६६ सालपासून अंधेरीचा राजा विराजमान झाला आहे. आझाद नगर उत्सव समिती हा गणेशोत्सव उत्सावाने साजरा करते. पश्चिम उपनगरातील हे लोकप्रिय गणेशमंडळ आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

New Cancer Treatment: आता Flash Radiotherapy द्वारे कॅन्सरवर काही मिनिटांत उपचार होण्याची शक्यता; जाणून घ्या सुरक्षित आणि जलद ट्रीटमेंटसाठी कशी उपयुक्त आहे

Pune Guillain-Barre Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे 2 जणांचा मृत्यू; एकूण प्रकरणांची संख्या 100 च्या पुढे, 17 रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर

Republic Day 2025 Google Doodle: लडाखी वेशभूषेतील हिमबिबट्या, पारंपरिक धोतर-कुर्ता घातलेला 'वाघ', भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त Google बनवले खास Doodle

Republic Day 2025 Messages in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त Wishes, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा राष्ट्रीय उत्सव!

Share Now