IPL Auction 2025 Live

CSMT Turns 133 Today: व्हिटी ते सीएसएमटी असे झाले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या नावात बदल

Wonderlust यांनी जगातील दहा आर्श्चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली होती त्यात सीएसएमटी स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.

CSMT Station (Photo Credits-Facebook)

Chhatrapti Shivaji Maharaj Terminus Turns 133 Today: जगातील सर्वात आश्चर्यकारक स्टेशन म्हणून मुंबईतील 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस; रेल्वे स्थानकाची नोंद झाली आहे. Wonderlust यांनी जगातील दहा आर्श्चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली होती त्यात सीएसएमटी स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज हे स्थानक मुंबईतील सर्वात मोठे रेल्वेस्थानक असून त्याची उभारणी आणि त्याच्यावरील नक्षीकाम हे पाहण्याजोगे आहे.सीएसएमटी स्थानकात प्रत्येक दिवशी हजारो नागरिकांची वर्दळ दिसून येते. त्याचसोबत युनेस्कोचे जागतिक वारसा लाभलेले असे हे रेल्वेस्थानक आहे. सीएसएमटीच्या परिसरात अनेक पर्यटक सुद्धा तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जगभरातून येत असतात. तर आज (20 जून) सीएसएमटी स्थानकाला 133 वर्ष पुर्ण झाली असली तरीही त्याचे सौंदर्य पूर्वीसारखेच खुलून दिसते.

तर मार्च 1996 पर्यंत सीएसएमटी स्थानक 'व्हिक्टोरिया टर्मिनस' (व्हिटी) म्हणून ओळखले जायचे. मात्र त्यानंतर त्याचे नामकरण करण्यात आल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' या नावाने ओळखले जाऊ लागले. तर जाणून घ्या व्हिटी ते सीएसएमटी स्थानकाबाबत काही खास गोष्टी.(Happy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो)

- ब्रिटिश आर्किटेक्ट एफ. डब्लू. स्टीव्हन यांनी डिझाइन केलेली ही वास्तू बॉम्बे (मुंबई) चे प्रतीक बनले. या भव्य वास्तूच्या आर्किटेक्टमुळे त्याला 'Gothic City' असे लेबल लावण्यात आले.

-यापूर्वी सीएसएमटी स्थानकाला राणी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जात होते. तर 1879 मध्ये संजय हडकर यांनी बांधले होते.

-छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवेशद्वाराबाबत बोलायचे झाल्यास तेथे ब्रिटन आणि भारत या दोन देशांचे प्रतिनिधित्व करणारे सिंह आणि वाघाच्या मुर्त्या दिसून येतात.

-सीएमएमटी स्थानकात विविध सणांच्या वेळी रोषणाई सुद्धा करण्यात येते. ही रोषणाई फोटोग्राफर्सचे लक्ष वेधून घेणारी ठरते.

-1996 मध्ये रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांनी स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असे ठेवले.

-सीएसएमटीच्या स्थानकावरील नक्षीकामात व्हिटोरियन-गोथिक पद्धतीसह मुघल शैली सुद्धा दिसून येते.

-छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनच्या मुख्यभागी असलेल्या घड्याळाखाली यापूर्वी राणी एलिझाबेथ यांचा पुतळा होता. परंतु 1950 मध्ये सरकारच्या आदेशानुसार या वास्तूवरील सर्व ब्रिटिश पुतळे हटवण्यात आले होते.

तर 2017 मध्ये जून महिन्यात स्थानकाच्या नावात बदल करण्यात आला. त्यांनंतर स्थानकाच्या नावामध्ये महाराज हा शब्द लावण्यात आल्यानंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओखळले जाऊ लागले आहे. त्यानंतर 2018 मध्ये दहशतवाद्यांनी सीटएसएमटी स्थानकाला सुद्धा हल्ल्यामध्ये सहभागी केले होते. तर या घटनेने संपूर्ण मुंबईला धक्का बसला होता. या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्येक गोष्टींचा आज जरी विचार केल्यास अंगावर काटा उभा राहतो.