Matru Din 2022 Wishes in Marathi: मातृदिनानिमित्त Facebook Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून आईला द्या खास शुभेच्छा!
यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करून आईला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.
Matru Din 2022 Wishes in Marathi: श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी अपत्य नसलेल्या महिला उपवास करतात आणि बाळाच्या जन्मासाठी प्रार्थना करतात. तसेच सर्व मातांना या दिवशी शुभेच्छा दिल्या जातात. भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या म्हणजेच 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya) च्या दिवशी मातृदिन (Matru Din) साजरा केला जातो. यंदा हा दिवस 26 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे.
मातृदिनानिमित्त Facebook Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून आपल्या आईला खास शुभेच्छा द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करून आईला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Ganeshotsav 2022 Dates: हरतालिका, ज्येष्ठा गौरी पूजन ते अनंत चतुर्दशी यंदा गणेशोत्सवातील पहा महत्त्वाच्या सणांच्या तारखा!)
आई म्हणजे, वात्सल्याचा ठेवा
आई म्हणजे, अमृताचा गोडवा
आई म्हणजे, पावसाचा ओलावा
आई म्हणजे, सुखाचा गारवा
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई नसते केवळ काया
आई असते ओंजळ भर माया
आई असते गगण भरारी
आई असते जसे एक अक्षयगान
आई असते जसे कर्णाचे दान
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भुकेल्या जीवाचा मायेचा घास तू
वेदनेनंतरची माझी पहिली हाक तू
अंधारालाही दूर करणारा प्रकाश तू
अन् शेवटच्या क्षणापर्यंतचा कुशीतला
विसावा तू…..!!
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हृदयाच्या स्पंदनातील प्रत्येक श्वास म्हणजे आई
अंधारालाही दूर करणारा प्रकाश म्हणजे आई
माझ्या मायेची धरती अन् छायेचं आकाश म्हणजे आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई या शब्दात दोन अक्षरे आहेत,
पण या शब्दात नभा इतके सामर्थ्य आहे,
“आ” म्हणजे आत्मा आणि “ई” म्हणजे ईश्वर
हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासाठी
दोन अक्षरे ती म्हणजे “आई”
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मातृदिन हा आईच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. मातृदिनानिमित्त तुम्ही आपल्या आईला शुभेच्छा व्यतिरिक्त खास गिफ्ट देऊन तिचा दिवस आणखी स्पेशल करू शकता.