Margashirsha Guruvar Vrat 2020 Dates: मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची यंदा 17 डिसेंबर पासून सुरूवात; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!

या मार्गशीर्ष गुरूवार निमित्त केल्या जाणार्‍या महालक्ष्मी व्रताची सुरूवात 17 डिसेंबर पासून होणार असून सांगता 7 जानेवारी 2021 मध्ये होणार आहे.

Margashirsha Guruvar Vrat | Photo Credits: Facebook

Margashirsha Guruvar Vrat 2020 Start Date:  महाराष्ट्रात श्रावणाइतकातच धार्मिक व्रत वैकल्यांची रेलचेल असणारा अजून एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष(Margashirsha) . मराठी कालदर्शिकेप्रमाणे मार्गशीर्ष हा नववा महिना आहे. या महिन्यात चंपाषष्ठी, गीता जयंती हे सण साजरे केले जातात त्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात असणारे अजून एक आकर्षण म्हणजे मार्गशीर्ष गुरूवारचे व्रत(Margashirsha Guruvar Vrat) . महालक्ष्मीच्या उपासकांसाठी आणि प्रामुख्याने महिला वर्गासाठी हे मार्गशीर्ष गुरूवारचे व्रत महत्त्वाचे असते. मार्गशीषातल्या चारही गुरूवारी हे व्रत करून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात सुख, समृद्धी नांदावी म्हणून विशेष प्रार्थना केली जाते. तसेच शेवटच्या गुरूवारी महिलांना, कुमारिकांना, तरूणींना घरी आमंत्रण देऊन हळदी कुंकू व वाण देऊन या व्रताची दरवर्षी सांगता करण्याची प्रथा आहे. Margashirsha Guruvar Vrat 2020 Wishes: मार्गशीर्ष गुरूवार व्रत मराठी शुभेच्छा HD Images, Wallpapers द्वारा देऊन मंगलमय करा महालक्ष्मी व्रताचा दिवस.

यंदा महाराष्ट्रात 14 डिसेंबरला सोमवती अमावस्येनंतर 15 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात होणार आहे. या मार्गशीर्ष गुरूवार निमित्त केल्या जाणार्‍या महालक्ष्मी व्रताची सुरूवात 17 डिसेंबर पासून होणार असून सांगता 7 जानेवारी 2021 मध्ये होणार आहे. मग पहा यंदा मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताचे नेमके 4 दिवस कोणते आहेत? नक्की वाचा: Margashirsha Guruvar Vrat Puja 2020: मार्गशीर्ष गुरूवार दिवशी महालक्ष्मीचा घट आकर्षकरित्या असा सजवा (Watch Video).

मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रत 2020 तारखा

पहिला गुरूवार - 17 डिसेंबर

दुसरा गुरूवार - 24 डिसेंबर

तिसरा गुरूवार - 31 डिसेंबर

चौथा गुरूवार - 7 जानेवारी

यंदा 15 डिसेंबरला सुरू होणार्‍या मार्गशीर्ष महिन्याची सांगता 13 जानेवारी दिवशी होणार आहे. मार्गशीर्ष हा महिना देखील मंगलमय आणि शुभ कार्यांसाठी खास मानला जात असल्याने या महिन्यात अनेक चांगल्या कामांची देखील सुरूवात केली जाते.

महिला मार्गशीर्षातल्या प्रत्येक गुरूवारी व्रत ठेवण्यासाठी घरात विशेष पूजा मांडतात. महालक्ष्मीची आराधना करताना दिवसभराचा उपवास ठेवतात. या महिन्यातही अनेक घरांमध्ये मांसाहार महिन्याभरासाठी व्यर्ज असतो. तर शेवटच्या गुरूवारी महिला नातलग आणि आसपासच्यामहिलांना घरी बोलावून मसाला दूधाचा बेत करतात. लक्ष्मीरूपी आलेल्या प्रत्येक स्त्रीला नमन करून तिला फुलं, एखादी वस्तू देऊन व्रताची सांगता करतात.