Marathi Bhasha Din 2020 Messages: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा Wishes, Greeting, Whatsapp Status, Images, Facebook च्या माध्यमातून देऊन राखा आपल्या या भाषेचा मान
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशा या महान दिवसाच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा:
Marathi RajBhasha Din Marathi Messages: आपल्या कवितेतून मराठीचा, मराठी भाषेचा प्रसार करणारे मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज (Kusumagraj) यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय असून आपण आणि भविष्यातील पीढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन' साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांना 1987 साली साहित्य विश्वातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारकडून कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्याला सुरूवात केली.
27 फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. या दरम्यान विविध प्रकारचे मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशा या महान दिवसाच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा: Marathi Bhasha Din 2020 Wishes: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देणारे संदेश, Greeting, Messages, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करून जपा आपल्या मातृभाषेचा वसा!
हेदेखील वाचा- Marathi Rajbhasha Din 2020: मराठी राजभाषा दिन कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त का साजरा केला जातो?
आज अनेक लोक बदलत्या काळानुसार स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. यात काहीच वाद नाही माणूस कुठेही असो पण आपल्या मातीशी आणि आपल्या भाषेची जोडला असला पाहिजे. नाहीतर इंग्रजी माध्यमात गेल्यास एखाद्याला मराठी भाषाच बोलता आली नाही तर ही गोष्ट नक्की कौतुकास्पद नाही. म्हणून मराठी भाषेचा मान राखणे आणि अभिमान बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!