IPL Auction 2025 Live

Marathi Patrakar Din 2023: मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी WhatsApp Status, Greetings, Messages!

6 जानेवारी 1832 दिवशी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले आणि 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता.

Marathi Patrakar Din | File Images

महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन (Marathi Patrakar Din) म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारिता क्षेत्रातील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांचा जन्मदिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पहिले मराठी वृत्तपत्र 'दर्पण' (Darpan) यांची सुरूवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केली आहे. 6 जानेवारी 1832 दिवशी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले आणि 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता. मग राज्य सरकार कडून बाळशास्त्रींच्या जन्मदिनाचं औचित्य साधत मराठी पत्रकार दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. मग आज मराठी पत्रकारांना या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छापत्रं शेअर करत तुम्ही त्यांचा दिवस खास करू शकता.

मराठी पत्रकार क्षेत्र आज पाक्षिकापासून डिजिटल मीडीयापर्यंत रूंदावलं आहे. गाव पातळ्यांवरही नियमित मराठी मध्ये पाक्षिकं, वृत्तपत्रं, मासिकं प्रसिद्ध होतात. त्याच्यामाध्यमातून लोकशाहीचं आधारस्तंभ असलेलं पत्रकारिता क्षेत्रं आज विस्तारत आहे.

मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

Marathi Patrakar Din | File Images
Marathi Patrakar Din | File Images
Marathi Patrakar Din | File Images
Marathi Patrakar Din | File Images
Marathi Patrakar Din | File Images

मराठी मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्यापासून प्रबोधनकार ठाकरे, बाळ ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी मराठी पत्रकारितेमध्ये आपलं योगदान दिले आहे. काहींनी आपल्या लेखनातून तर काहींनी व्यंगचित्रातून समाजाचं प्रबोधन करत अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे.