Raksha Bandhan 2024 Recipe: भाऊ बहिणीच्या नात्याला आणखी गोड बनवण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी बनवा खास पदार्थ, जाणून घ्या रेसिपी
रक्षा बंधनाच्या सणाला प्रत्येकाच्या घरात गोड पदार्थ बाजारातून आणले जातात. त्यात पेठा,बर्फी हे नेहमीचे झाले आहेत. त्यामुळे यंदा भेसळयुक्त पदार्थ बनवण्याऐवजी घराच्या घरीच हे पदार्थ बनवा
Raksha Bandhan 2024 Recipe: उद्या 19 ऑगस्ट रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण एकाच दिवशी महाराष्ट्रात साजरे केले जातात. रक्षा बंधनाच्या सणाला प्रत्येकाच्या घरात गोड पदार्थ बाजारातून आणले जातात. त्यात पेठा,बर्फी हे नेहमीचे झाले आहेत. त्यामुळे यंदा भेसळयुक्त पदार्थ बनवण्याऐवजी घराच्या घरीच हे पदार्थ बनवा. आपल्या भावासाठी आणि संपुर्ण कुटुंबासाठी घरीच पदार्थ बनवा. जे तुमच्या आरोग्याला हानी पोचवणार नाही. जाणून घ्या काही चविष्ट गोड पदार्थांची रेसिपी जी तुम्ही सहजपणे घरी बनवून शकता. (हेही वाचा- रक्षाबंधनासाठी काढा 'या' सुंदर, ट्रेंडी मेहंदी डिझाइन; पहा व्हिडिओ)
नारळाची बर्फी
नारळाची बर्फी ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नारळाची बर्फी बनवणे अगदी सोपी आहे, त्यामुळे कमी वेळेत तुन्ही हा पदार्थ बनवू शकता. ही बर्फी चविष्ट आणि पौष्टीक गोड पदार्थ आहे. रेपिसी साठी तुम्हाला २ कप ओला किसलेला नारळ, काजू बदाम, अर्धा कप साखर, वेलची पूड, तूप, एक कप दुध आणि केशर लागेल.
काजू कतली
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो ती काजू कतली. हा पदार्थ अगदी कमी वेळात घरीच बनवा. यासाठी दोन ते तीन कप काजूची पावडर आणि एक कप साखर, अर्धा कप पाणी आणि दोन चमचा तूप.
बासुंदी
हा महाराष्ट्राचा पारंपारिक गोड पदार्थ आहे. सणासुदीच्या दिवशी बासुंदी ही केली जाते. यासाठी तुम्हाला दुध,साखर, वेलची आणि सुकामेवा लागतो. ही रेसिपी सर्वांनाच आवडते. याशिवाय तुम्ही मावाशिवाय गोड पदार्थ बनवू शकता. यंदा या रक्षाबंधनाच्या वेळीस या रेसिपी नक्की बनवा.