Makar Sankranti Haldi Kunku Invitation in Marathi: मकर संक्राती ला हळदी कुंकू समारंभासाठी 'निमंत्रण पत्रिका' WhatsApp, Messages द्वारा शेअर करत मैत्रिणींना द्या आमंत्रण
हळदी कुंकवाला महिलांना, मुलींना बोलावण्यासाठी हे खास मेसेजेस आमंत्रण पत्रिकांच्या स्वरूपात शेअर करू शकता.
मकर संक्रांती (Makar Sankranti) च्या सणाच्या निमित्ताने नव्या वर्षात सणसमारंभांना सुरूवात होते. महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथ सप्तमी (Rath Saptami) पर्यंत महिना-दीड महिन्याच्या कालावधीमध्ये घराघरात हळदी कुंकवाच्या (Haladi Kunku) कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरात आजूबाजूच्या नातेवाईकांमधील, मित्रपरिवारातील महिलांना बोलावून त्यांना तिळगूळ आणि वाणाची एखादी वस्तू दिली जाते. आता हे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घरगुती स्वरूपापासून अगदी मोठ्या स्तरावर महिलांना एकत्र बोलावून देखील केला जातो. मग यावर्षी हळदी कुंकवाला महिलांना, मुलींना बोलावण्यासाठी हे खास मेसेजेस आमंत्रण पत्रिकांच्या स्वरूपात शेअर करू शकता.
नववधू लग्नानंतरची 5 वर्ष शृंगारातील 5 वस्तू हमखास महिलांना वाण म्हणून देते पण त्यानंतर तुमच्या आवडीनुसार अनेक वस्तू वाण म्हणून देऊ शकता. 2024 हे लीप ईयर असल्याने या वर्षात मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे 15 जानेवारीपासून 16 फेब्रुवारी (रथ सप्तमी) पर्यंत हळदी कुंकवाचे आयोजन केले जाऊ शकते. Makar Sankranti 2024 Bornahan: बाळाचं बोरन्हाण कसं करतात? जाणून घ्या यंदाच्या तारखा आणि बोरन्हाण करण्याची पद्धत!
पहा आमंत्रण पत्रिका नमुने
#1
चला सयांनो संस्कृती जपू..
रथसप्तमीच्या मुहूर्तावर आयोजित
हळदी कुंकू कार्यक्रमासाठी
आमच्या घरी अगत्याने येणे करावे..
तारीख:
वेळ:
पत्ता:
#2
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. .... रोजी साय॑काळी .. वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
पत्ता:
#3
हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात
लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात
रथसप्तमीच्या या शुभ मुहूर्तावर
आमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे.
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी..
तारीख:
वेळ:
पत्ता:
#4
विसरुनी सारी कटुता नात्यात, तीळगुळाचा गोडवा यावा
एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा
15 जानेवारी दिवशी सायं 7 वाजता मकरसंक्रांतीला हळदी कुंकू करण्याचे योजिले आहे
याकरिता आग्रहाचे आमंत्रण..
निमंत्रक-
पत्ता -
कुंकू हे सौभाग्याचं महत्त्वाचं प्रतिक आहे. त्यामुळे अनेक घरात तिन्ही सांजेला जर कुणी महिला आली तर तिला निरोपाच्या वेळी हळदी कुंकू लावलं जातं. मकर संक्रांती व्यतिरिक्त देखील मार्गशीर्ष गुरूवार व्रत, नवरात्र या दरम्यानही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.