Makar Sankranti: मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या इतिहास
14 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा दिवस हा शुभ उत्तरायणाची सुरुवात आहे. मकर संक्रांती ही विविधतेतील एकतेचे एक आदर्श उदाहरण आहे.
भारतातील प्रत्येक राज्यात मकर संक्रांती पाळण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, परंतु कापणीचा हंगाम हा सारखा घटक आहे. या दिवशी, सूर्यदेवाची पूजा केली जाते, प्रार्थना केली जाते आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते, तसेच मकर संक्रांती निमित्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. मकर संक्राती हा खऱ्या अर्थाने माहेरवासीनिंचा सण असतो. मकर संक्रांतीसाठी नवविवाहीत महिला माहेरी येतात. शेतातील, शिवारातील ज्वारी, गहू, हरबरा, बोरं, गाजर आणि विविध पिकांचा ओवसा तयार करतात आणि एकमेकांना ओवासतात. शहरांच्या तूलनेत ग्रामीण भागात हा सण अधिक उत्साहाने आणि पारंपरीक पद्धतीने साजरा होता. जाणून घ्या आशा या खास सणाच्या इतिहासाबद्दल.
मकर संक्रांतीचा इतिहास
पौराणिक कथेनुसार, असे मानले जाते की संक्रांती ज्यांच्या नावावरून या उत्सवाचे नाव ठेवले गेले आहे - ते संक्रांती नावाची देवी होती, देवीने शंकरासूर नावाच्या दुष्टाला मारले होते. मकर संक्रांतीच्या नंतर दुसऱ्या दिवशी करीदिन किंवा किंक्रांत असते. या दिवशी देवीने दैत्य किंकरासुरचा वध केला होता. त्यामुळे मकर संक्रांती साजरी केली जाते अशी मान्यता आहे.
मकर संक्रांतीचे महत्त्व
मकर संक्रांतीला लोक गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शिप्रा, नर्मदा इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. सूर्य देवाला जल अर्पण करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात.
लोक काशी, त्रिवेणी संगम आणि गंगा सागर यांसारख्या ठिकाणी स्नानासाठी गर्दी करतात.पवित्र नद्यान मध्ये डुबकी मारल्यास मोक्ष प्राप्त होते अशी मान्यता आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये मकर संक्रांत वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते.
- लोहरी: मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी, तेरा जानेवारीला हरियाणा आणि पंजाबमध्ये लोहरी साजरी केली जाते. संध्याकाळी, लोक शेकोटीभोवती जमतात आणि तांदूळ,लाह्या आगीच्या ज्वाळांमध्ये टाकतात. आनंद, आरोग्य, वाढ आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
- पतंग उत्सव: गुजरातमध्ये, मकर संक्रांतीच्या अद्भुत प्रसंगी पतंग उत्सव आयोजित केला जातो.
- देणगीचा सण : उत्तर प्रदेशमध्ये, हा मुख्यतः भेटवस्तू आणि दानाचा उत्सव आहे. अलाहाबादमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर एक महिना भरणारा माघ मेळा या दिवसापासून सुरू होतो. या शुभ दिवशी, उत्तर प्रदेशात लोक उपवास करतात आणि खिचडी देतात. त्याचप्रमाणे गोरखपूरच्या गोरखधाम येथे खिचडी मेळा भरतो.
- बंगालमध्ये मकर संक्रांतमध्ये स्नान केल्यानंतर तीळ दान करण्याची प्रथा आहे. गंगासागरात दरवर्षी मोठी यात्रा भरते.
- पोंगल: तामिळनाडूमध्ये मकर संक्रांतीच्या रंगीबेरंगी प्रसंगी, हा उत्सव चार दिवस पोंगल म्हणून ओळखला जातो.
- बिहारमध्ये मकर संक्रांतीच्या उत्सवामध्ये उडीद, तांदूळ,लोकरीचे वस्त्र देण्याचे विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्रात, सर्व विवाहित स्त्रिया त्यांच्या पहिल्या संक्रांतीला कापूस, तेल आणि मीठ इतर सुहागणांना (विवाहित स्त्री) दान करतात.
त्यामुळे भारतात मकर संक्रांती उत्सवाचे स्वतःचे महत्त्व आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी त्याची स्तुती केली जाते आणि साजरा केला जातो.