Makar Sankranti 2021 Bornhan: मकर संक्रांत निमित्त लहान मुलांना बोरन्हाण का घातले जाते? कशी कराल तयारी? जाणून घ्या

त्याचप्रमाणे नव्या बाळासाठी देखील पहिली मकर संक्रांत विशेष असते. पहिल्या संक्रांती निमित बाळाला शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण घातलं जातं.

मकर संक्रांत 2021 बोरन्हाण | फोटो क्रेडिट: इंस्टाग्राम

अवघ्या दोन दिवसांवर मकर संक्रांतीचा सण आला आहे. मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचा मोठा उत्साह महिलावर्गात असतो. नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत तर अगदी खासच असते. त्याचप्रमाणे नव्या बाळासाठी देखील पहिली मकर संक्रांत विशेष असते. पहिल्या संक्रांती निमित बाळाला शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण घातलं जातं. परंतु, लहान मुलांना बोरन्हाण घालण्यामागे नेमका काय उद्देश आहे? जाणून घेऊया. पाहायला गेलं तर आपल्याकडील सर्वच सण, उत्सव आनंददायी आणि अर्थपूर्ण आहेत. त्यामागे लोकांना एकत्रित आणण्याचा हेतू आहे. बोरन्हाण करण्यामागे नेमकं का आणि कसं करतात? जाणून घेऊया...

बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखणे हा यामागील उद्देश. बोरन्हाण निमित्त बाळाच्या डोक्यावरुन बोरं, भुईमुगाच्या शेंगा, तीळ, उसाचे करवे, गाजराचे तुकडे, हलवा आदी टाकले जातात. यानिमित्ताने हंगामी फळं खाल्ली जातात. त्यामुळे थंडीच्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि आपसुकच आरोग्य राखलं जातं. बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखणे हा यामागील उद्देश. (Makar Sankranti Special Halwyache Dagine: मकर संक्रांती करता लहान मुले व महिलांसाठी घरी बनवा 'हे' आकर्षक हलव्याचे दागिने, Watch Videos)

बोरन्हाणाचा कार्यक्रम कसा कराल?

लहान मुलांचा बोरन्हाण हा एक छोटेखानी कार्यक्रम असतो. संक्रात ते रथसप्तमी या कालावधीत केव्हाही बोरन्हाण करता येतं. या कार्यक्रमासाठी इतर लहान मुलांना आमंत्रित केले जाते. यासाठी लहान मुलाला अथवा मुलीला काळे कपडे, हलव्याचे दागिने घातले जातात. छान नटवून बाळाला पाटावर बसवले जाते. बाळ अगदीच लहान असेल तर आत्या किंवा मावशीच्या मांडीवर बसवले जाते. बाळाचे औक्षण करुन त्याच्या डोक्यावरुन बोरं, भुईमुगाच्या शेंगा, तीळ, उसाचे करवे, गाजराचे तुकडे, हलवा, तिळगुळ, चॉकलेट्स टाकले जातात. जमलेली लहान मुलं हे पदार्थ वेचतात आणि खातात.

नातेवाईक, इतर लहान मुलं यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम साजरा केला जातो. त्यामुळे नातलग, आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतात. मात्र यंदा फार गर्दी न करता अगदी घरच्या घरी तुम्ही तुमच्या बाळाच्या बोरन्हाणाची हौस पुरवून घेऊ शकता.



संबंधित बातम्या

ZIM vs PAK 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून केला पराभव, सॅम अयुबने ठोकले शतक, पाहा सामन्याचे स्कोअरकार्ड

ENG vs WI 4th T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या T20 मध्ये इंग्लंड विजयाची मालिका कायम ठेवणार, हेड टू हेड रेकॉर्ड, सामन्यापूर्वी लाईव्ह स्ट्रिमींगबाबत घ्या जाणून

ENG Beat WI 3rd T20I 2024: इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव करून मालिकेत घेतली 3-0 अशी अभेद्य आघाडी, इंग्लिश फलंदाजांचा शानदार खेळ

ENG vs WI 2nd ODI 2024 Preview: इंग्लंड संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा करेल सामना, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून