Mahatma Jyotiba Phule Jayanti 2026: स्त्री शिक्षणाचे जनक आणि क्रांतीसूर्याचे प्रेरणादायी विचार

महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती 11 एप्रिल 2026 रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने त्यांचे शिक्षण, समता आणि मानवी हक्कांवर आधारित प्रेरणादायी विचार आणि शुभेच्छा संदेशांचा आढावा घेणारा हा विशेष लेख.

11 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. 1827 मध्ये जन्मलेल्या ज्योतिबांनी समाजातील जातीभेद, विषमता आणि अज्ञानाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. विशेषतः स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवले जात आहेत.

महात्मा फुले केवळ शिक्षणतज्ज्ञ नव्हते, तर ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हिरिरीने बोलणारे पहिले आधुनिक नेते होते. त्यांनी त्यांच्या 'शेतकऱ्याचा आसूड' या ग्रंथातून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक आणि सावकारी पाशाचा पर्दाफाश केला. "माणसाला त्याच्या कष्टाचे योग्य फळ मिळाले पाहिजे आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळायला हवी," असे त्यांचे स्पष्ट मत होते. कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा आजही कृषी धोरणांना दिशा देणारा ठरत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जयंती 2026 स्टेटस

सत्याचा शोध घेणे हाच मानवाचा मुख्य धर्म असावा, यासाठी त्यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली होती.

Famous Quotes by Mahatma Phule

स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो, कधी जातीचा तर कधी धर्माचा.

mahatma phule quotes in marathi

खाणे-पिणे आणि वैवाहिक संबंधांवर

जातीचं बंधन असेपर्यंत भारतात

राष्ट्रीय ऐक्याची भावना बळकट होणार नाही.

महात्मा फुले शायरी मराठी

सामाजिक कार्याची पार्श्वभूमी

महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८४८ मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. केवळ शाळा काढून ते थांबले नाहीत, तर त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून त्यांना शिक्षिका बनवले. १८७৩ मध्ये त्यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली, ज्याचा मुख्य उद्देश शोषित वर्गाला न्याय मिळवून देणे हा होता. आजही त्यांचे कार्य आणि विचार हे महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचा पाया मानले जातात.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement