Mahatma Jyotiba Phule Jayanti 2024 Quotes: महान समाज सुधारक महात्मा फुले यांची आज जयंती, जाणून घ्या, त्यांचे अमूल्य विचार
महात्मा ज्योतिबा फुले हे समाजसेवक, लेखक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी झाला. ज्योतिरावांच्या कुटुंबाने पेशव्यांसाठी फुलविक्रेते म्हणून काम केले, म्हणून त्यांना मराठीत फुले म्हणतात.
Mahatma Jyotiba Phule Jayanti 2024 Quotes: 19व्या शतकातील एक महान समाज सुधारक महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी म्हणजे आज आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे समाजसेवक, लेखक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी झाला. ज्योतिरावांच्या कुटुंबाने पेशव्यांसाठी फुलविक्रेते म्हणून काम केले, म्हणून त्यांना मराठीत फुले म्हणतात. १८४० मध्ये सावित्रीबाई फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी, बालविवाह थांबवण्यासाठी, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देण्यासाठी आणि दलितांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले यांचे विचार समाज नेमका कसा असावा याबद्दलची शिकवण देतील, थोरांना आपण जयंती निमित्त पुजतो परंतु त्यांच्या विचारांचा आपल्याला विसर पडत चालला असे दिसून येत, दरम्यान, आम्ही काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत जे तुम्ही प्रियजनांना पाठवू शकता.
पाहा खास शुभेच्छा संदेश:
ज्योतिबांच्या जयंतीनिमित्त आज पुन्हा एकदा त्यांचे हे विचार अनेकांना विचार करण्यास प्रवृत्त करतील आणि प्रेरणा देतील, दरम्यान तुम्ही वर दिलेले खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि आजचा दिवस आणखी खास बनवू शकता.