महाशिवरात्री 2026 रांगोळी डिझाईन्स: घराची शोभा वाढवण्यासाठी खास रांगोळी डिझाईन्स आणि आध्यात्मिक महत्त्व

महाशिवरात्री 2026 निमित्त घराचे अंगण सजवण्यासाठी विविध आकर्षक रांगोळी प्रकार, सणाचे महत्त्व आणि 15 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या या खास दिवसाची माहिती देणारा विशेष लेख.

Mahashivratri 2024 HD Images (PC - File Image)

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला जाणारा महाशिवरात्रीचा सण यंदा रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होणार आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा दिवस देशभरात उत्साहात साजरा केला जातो. या मंगल प्रसंगी घराचे अंगण आणि देवघर सजवण्यासाठी रांगोळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ शोभा वाढवण्यासाठीच नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी महाशिवरात्रीला विशेष रांगोळ्या काढल्या जातात.

महाशिवरात्री रांगोळी

दूसरी डिजाइन

यावेळी रांगोळीत प्रामुख्याने पांढरा, निळा आणि भगवा या रंगांचा वापर करण्याचा कल दिसून येत आहे. पांढरा रंग शांततेचे, तर निळा रंग महादेवाच्या निळकंठ रूपाचे प्रतीक मानला जातो. जर तुम्हाला पावडरच्या रांगोळीचा पर्याय नको असेल, तर झेंडूची फुले आणि आंब्याची पाने वापरून काढलेली नैसर्गिक रांगोळी देखील यंदा ट्रेंडमध्ये आहे.

महाशिवरात्री २०२६: तिथी आणि मुहूर्त

पंचांगानुसार, फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी होते. यंदा चतुर्दशी तिथी १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५:०४ वाजता सुरू होणार असून ती १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५:३४ वाजता समाप्त होईल. रात्रीच्या पूजेला (निशिता काळ) विशेष महत्त्व असल्याने १५ फेब्रुवारीच्या रात्रीच मुख्य उत्सव साजरा केला जाईल.

आध्यात्मिक महत्त्व

महाशिवरात्री ही केवळ उपवास करण्याची रात्र नसून ती आत्मशुद्धीची रात्र मानली जाते. रांगोळी काढणे हे भक्ती व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. अंगणात रांगोळी काढून दीप प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होऊन शिवाचे आशीर्वाद लाभतात, अशी श्रद्धा आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement