 
                                                                 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत 1 जुलै हा दिवस राज्यात 'महाराष्ट्र कृषी दिन' (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांची मोलाची कामगिरी होती. आपला खरा अन्नदाता हा शेतकरी आहे, पण त्याचीच अवस्था बिकट आहे. कृषी क्षेत्रासमोर असलेल्या आव्हानामुळे अनेक शेतकरी आज आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. पण या कृषी दिनाचं औचित्य साधत शेतकर्यांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी राज्यातील शेतकर्याला 'महाराष्ट्र कृषी दिना'च्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास शुभेच्छापत्र आणि मेसेजेस WhatsApp Status, HD Images, Wishes शेअर करत या दिवसाचं महत्त्व वाढवा.
वसंत नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे आणि सर्वाधिक मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले मुख्यमंत्री आहेत. 1963-75 या काळात ते मुख्यमंत्रीपदी होते. दरम्यान शेतकर्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसंत नाईक यांचा मोठा मोलाचा वाटा आहे.
कृषीदिनाच्या शुभेच्छा





सद्यस्थितीला दुष्काळ, अतिवृष्टी, वातावरणातील बदल, दिवसेंदिवस घटत चालेली पाणी पातळी आणि सरकाची शेतीविषयी असलेली आनास्था ही आजच्या शेतीपुढली मोठी आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करतच येथील शेतकरी देशाला कृषी प्रधान करत आहे. समोर कितीही मोठे प्रश्न असले तरी बळीराजा वर्षभरातील सण उत्सव आणि विविध दिवस साजरे करत असतो.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
