Maharashtra Krishi Din 2022 Messages: महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून शेतकऱ्यांना द्या खास शुभेच्छा!
यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील.
Maharashtra Krishi Din 2022 Messages: हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने 1 जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांचा जन्मदिन 'महाराष्ट्र कृषी दिन' (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील. (हेही वाचा - Maharashtra Krishi Din 2022: महाराष्ट्र कृषी दिन कधी आहे? हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या)
कडाक्याचे ऊन असो वा
सोसाट्याचा वारा किंवा बरसत
असो पावसाच्या ओल्याचिंब
धारा तरी राबतो आपला सर्जाराजा
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
करून शेती उगवून धान
यातचं खरी बळीराजाची शान
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
साधी राहणी , मजबूत बांधा
तोच आहे शेतकरी राजा
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा!
करूनी कष्ट गाळूनी घाम
साऱ्या जगाला पुरवितो धान
असा आहे आपला शेतकरी महान.
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शेतकरी आहे अन्नदाता
तोच आहे
देशाचा खरा भाग्यविधाता
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा!
महाराष्ट्राच्या इतिहासात हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी या दिवशी विविध उपक्रम राबविण्यात येतात. वसंतराव नाईक यांनी राज्यात 'कृषी विद्यापीठां'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली.