Maharashtra Kolhapur and Solapur Eid Moon Sighting 2019 Eid Al Fitr Announcement Live Updates: चंद्र दर्शन होताच महाराष्ट्रात सुरु होणार ईदचा उत्साह; सोलापूर ,कोल्हापूर येथील घडामोडींचे येथे जाणून घ्या लाईव्ह अपडेट

मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणाऱ्या रमजानच्या महिन्यातील आज 29 वा रोजा आहे. चंद्रदर्शनाने या महिन्याची सांगता होईल. ईदचा चंद्र पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता असेल.

05 Jun, 01:59 (IST)

राज्यातील मुस्लिम बांधवांसाठी आनंदाचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश राज्यात कानपूर, लखनऊ येथेही दिसला ईदचा चांद. देशभरातील विविध ठिकाणी चंद्र दर्शन. भारतभर उद्या साजरी होणार रमजान ईद.

05 Jun, 01:46 (IST)

नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांची उत्सुकता आणि अतुरताही अखेर संपली असून आकाशात ईदचा चांद दिसला आहे. मुंबई, अहमदनगर, नाशिक आदी ठिकाणी चंद्र दर्शन घडल्यामुळे उद्या राज्यभरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

05 Jun, 01:45 (IST)

ईद साजरी करण्यासाठी मोठ्या आतुरतेने आकाशाकडे डोळे लाऊन बसलेल्या मुंबईतील मुस्लिम बांधवांना अखेर चंद्र दर्शन घडले आहे. त्यामुळे शहरात ईदचा उत्साह सुरु झाला आहे. ईतचा चंद्र दिसल्याने मुंबई आणि राज्यभरात उद्या साजरी होणार रमजान ईद.

05 Jun, 01:33 (IST)

चंद्र दर्शन घडल्याने अहमदनगरमध्ये ईदचा उत्साह सुरु झाला आहे. आज रात्री आठच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे चंद्र दर्शन घडले

05 Jun, 01:26 (IST)

मुंबई शहर, उपनगर आणि उपनगरांलगतचा काही भागांत चंद्र दर्शन घडल्याचे वृत्त आहे. प्रामुख्याने वर्सोवा येथे चंद्र दर्शन घडल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

05 Jun, 01:24 (IST)

जगभरातील इस्लाम धर्मिय बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना समाप्तीच्या टप्प्यात अल्पावधीतच होऊ शकतं चंद्र दर्शन

05 Jun, 01:21 (IST)

अद्यापही चांद न दिसल्याने ईदसाठी प्रतिक्षाच करावी लागत आहे. ईदची तयारी जय्यद झाली असतानाही चंद्र दर्शन न होणे हे उत्सुकता वाढवणारे आहे.

05 Jun, 01:16 (IST)

ईदच्या जल्लोषासाठी मुस्लिम बांधवांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, सर्वांनाच उत्सुकता आहे ती, चंद्र दर्शनाची. अद्याप तरी चंद्र दर्शन घडले नाही. त्यामुळे ही उत्सुकता कायम आहे.

 

05 Jun, 01:13 (IST)

जगभरातील ईद उत्सवावर नजर टाकता संयुक्त राष्ट्र (UAE) च्या मून सायटींग कमिटीने 4 जून रोजीच ईद साजरी करण्याचे ठरवले आहे. या कमिटीनुसार शवालचा महिना मंगळवारपासून सुरु होत आहे.ईद म्हणजेच ईद-उल-फितर हा मुस्लिम धर्मियांचा अत्यंत पवित्र सण म्हणून ओळखला जातो. हा सण इस्लाम धर्मिय मोठ्या उत्साहात साजरा करतात.

 

05 Jun, 01:02 (IST)

ईदचा चांद पाहण्यासाठी मुस्लिम बांधवांमध्ये  उत्साह अधिकाधिक वाढत चालला आहे. तर ज्या दिवशी ईदचा चंद्र दिसून येतो तो दिवस रमजानचा शेवटचा दिवस असल्याचे मानले जाते. त्याचसोबत रमजान संपल्यानंतर ईद-उल-फितर साजरी करण्यात येते

05 Jun, 24:43 (IST)

रमजान महिना इस्लाम धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना म्हणून ओळखला जातो. रमजानचा महिना संपला की 1 शवाल रोजी ईद-उल-फितर साजरी केली जाते. ईद साजरी करण्यासाठी चंद्र दर्शन होणे महत्त्वाचे ठरते. चंद्र दर्शन होण्यासाठी सर्वजण प्रतिक्षेत आहेत.

05 Jun, 24:13 (IST)

 

संपूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधव सज्ज झाले आहेत. मात्र, इस्लामच्या नियमानुसार चंद्र दर्शन घडल्यानंतरच ईद सुरु होते. त्यामुळे कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील ईस्लामधर्मिय जनतेचे लक्ष मोठ्या प्रमाणवर आकाशाकडे लागले आहे.


Eid Moon Sighting in Maharashtra (Kolhapur and Solapur): मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणाऱ्या रमजानच्या महिन्यातील आज 29 वा रोजा आहे. चंद्रदर्शनाने या महिन्याची सांगता होईल. ईदचा चंद्र पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता असेल. महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर या शहरांमध्ये आज संध्याकाळी ईदचा चाँद दिसू शकतो. त्यानंतर ईदचा सण साजरा केला जाईल.

ईदचा चाँद दिसल्यानंतर महिनाभर चालू असलेला रोजा सोडला जाईल. ईदच्या सणानिमित्त अनेक मुस्लिम बांधव एकत्र येत एकमेकांची गळाभेट घेऊन 'ईद मुबारक' अशा शुभेच्छा देतात. मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. या दिवशी नवीन पोशाख घालून लोक एकत्र जमतात. त्या ठिकाणाला 'ईदगाह' म्हणतात. ईदनिमित्त नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी होतात. भेटवस्तू, गिफ्ट्स आणि पंचपक्वान्न यांची रेलचेल असते. (Eid 2019 Special Phirni Recipe: नात्यांमध्ये गोडवा आणणारी मुस्लिम पद्धतीची फिरनी एकदा चाखाच, पाहा रेसिपी)

वर्षातून एकदा येणाऱ्या या सणाची सर्व मुस्लिम बांधव आतुरतेने वाट पाहत असतात. लहान-थोरांना आनंद देणारा या सणाला चंद्रदर्शनाने पूर्णत्व येईल.

 

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now