Happy Maharashtra Day Quotes: गोविंदाग्रज ते रामदास स्वामी यांच्या शब्दांत महाराष्ट्राची महती पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रिटिंग्स !

स्वामी रामदासांपासून गोविंदाग्रज, राजा बढे यांच्या शब्दांत आज महाराष्ट्रातील जनतेला द्या 60 व्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

Maharashtra Din 2020 Quotes| File Photo

Maharashtra Day Quotes in Marathi: यंदा या सेलिब्रेशनचं 60 वं वर्ष आहे. भाषावार प्रांत रचनेनुसार मराठी भाषिकांना महाराष्ट्र राज्य हे मुंबईसह मिळालं. दरम्यान मुंबईसह महाराष्ट्र मिळवणं ही सोप्पी गोष्टी नव्हती. त्यासाठी मोठा लढा झाला.  स्वामी रामदासांपासून गोविंदाग्रज, राजा बढे या मराठी साहित्य विश्वातील महारथींनी त्यांच्या लेखणीतून महाराष्ट्राचे खास वर्णन केले आहे. मग आज जाणून घ्या विविध महाराष्ट्र गीतांमधील आपल्या राज्याबद्दलची ही प्रेरणादायी वर्णनं काय आहेत. आजच्या पिढीला हा आपल्या मराठी भाषिकांचा लढा, दैदिप्यमान कामगिरी आणि पराक्रम काही साहित्यिकांच्या शब्दांतून सांगण्यासाठी थोरा-मोठ्यांनी काव्यामधून, मराठी साहित्यामधून पुढल्या पिढीपर्यंत नेण्यासाठी ही मराठमोठी ग्रिटिंग्स (Greetings), Quotes, मेसेज शेअर करायला विसरू नका. यंदा महाराष्ट्रासह अवघा भारत देश कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई लढत आहे. त्यामुळे जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून दूर राहायचं असेल तर यंदा घरीच राहून महाराष्ट्र दिन साजरा करा. मात्र इंटरनेटमुळे अवघ्या एका क्लिकवर सोशल मीडीयात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर, हाईक, टेलिग्राम अशा विविध प्लॅटफॉर्मवर तुम्ही यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही पराक्रमी महाराष्ट्राची गाथा सांगण्यासाठी ही खास शुभेच्छापत्र शेअर करायला विसरू नका. Happy Maharashtra Day 2020 Messages: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश, Wishes, Greetings, WhatsApp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा हा गौरवदिन!

महाराष्ट्र दिन 2022

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

Maharashtra Din 2020 Quotes| File Photo

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा

Maharashtra Din 2020 Quotes| File Photo

।। मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

Maharashtra Din 2020 Quotes| File Photo

बहु असोत सुंदर संपन्न की महा,

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

60 व्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharashtra Din 2020 Quotes| File Photo

महाराष्ट्र दिना दिवशी या कोट्स प्रमाणेच जगभरात लोकप्रिय असणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅपवर तुम्ही स्टिकर्सच्या माध्यमातूनही महाराष्ट्र दिनच्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्हांला गूगल प्ले स्टोअरवर खास स्टिकर पॅक डाऊनलोड करायचा आहे.