Maharashtra Din 2025: आचार्य अत्रे यांचा हट्ट आणि राज्याला मिळालं 'महाराष्ट्र' हे नाव; पहा यापूर्वी काय ठरलं होतं नाव

1956 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी 5 वर्षांसाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. नंतर लोकसभेने द्विभाषिक बॉम्बे (मुंबई) राज्याचा ठराव मंजूर केला.

Acharya Atre and Samyut Maharashtra Chalval | WIkipedia Commons

यंदा 1 मे दिवशी 66 वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Din)  आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार, मराठी बांधवांना स्वतंत्र राज्य देण्यात आले. मात्र मुंबई सह अखंड महाराष्ट्र मिळावा यासाठी मराठी लोकांनी मोठं आंदोलन उभारून आणि 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन या राज्याची निर्मिती झाली आहे. दरम्यान मराठी भाषिकांच्या राज्याला 'महाराष्ट्र' (Maharashtra)  हे नाव देण्यामागे प्रल्हाद केशव अत्रे (Pralhad Keshav Atre) अर्थात आचार्य अत्रे यांचा मोलाचा वाटा आहे. जाणून घ्या आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव कसं मिळालं? नक्की वाचा: Maharashtra Din Wishes 2025: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत मराठी बांधवांसोबत आनंद करा द्विगुणित. 

महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक मराठी जनांचा हातभार लागला आहे. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे आचार्य अत्रे. आचार्य अत्रे हे नाटककार, उत्तम वक्ते आणि पत्रकार देखील होते. साप्ताहिक नवयुग आणि नंतर दैनिक मराठा मधून त्यांनी मराठी बांधवांच्या राज्याला 'महाराष्ट्र' हे नाव देण्याची मागणी केली. मोरारजी देसाई सुरू असलेली मनमानी, पुढे राज्यात उभी राहिलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यामध्ये अत्रेंनी आपला आपला रोखठोक स्वभाव दाखवला.

मोरारजी देसाई यांना मुख्यमंत्री पदावरून हटवत बॉम्बे प्रेसिडंसीची सूत्र यशवंतराव चव्हाण यांच्या हातात देण्यात आली. केंद्र सरकारला वाटलं होतं की या खांदेपलटामुळे सारं सुरळीत होईल पण संयुक्त महाराष्ट्र समितीने आपला लढा कायम ठेवला. 1957 च्या विधानसभेत अत्रेंनी तुफान प्रचार केला. त्यांच्या धगधगत्या विचारांसमोर कॉंग्रेसचे पानीपत झाले कॉंग्रेसचे केवळ यशवंतराव चव्हाण निवडून आले होते. यानंतर केंद्राने मुंबई सह महाराष्ट्र राज्य निर्मितीचा विचार केंद्राने गांभीर्याने करायला सुरूवात केली.

महाराष्ट्र नावासाठी आचार्य अत्रेंनी लढवली खिंड

दैनिक मराठा मधून आचार्य अत्रे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला होता. केंद्राकडून आधी मराठी जनांच्या राज्याचं नाव 'मुंबई' राज्य ठेवण्याचा मानस होता. मात्र अत्रेंच्या एका अग्रलेखाने राज्यात पुन्हा वादळ निर्माण केले. 'याद राखा, महाराष्ट्राचे नाव बदलाल तर' या अग्रलेखातून त्यांनी मराठी भाषिकांचे राज्य 'महाराष्ट्र' असेल. ही मागणी धरून ठेवली. 'महाराष्ट्र या नावात ब्रम्हांड आहे आणि या नावासाठी मराठी माणूस आकाश पाताळ एक करेल' असे अत्रे म्हणाले होते.

मार्च 1960 मध्ये वाढता वाद लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली आणि राज्याच्या नावासाठी 'महाराष्ट्र' या नावावर शिक्कामोर्तब झालं.

महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास

भाषावार प्रांतरचनेसाठी राज्य पुनर्गठन अधिनियम, 1956 ने भाषेच्या आधारावर भारतातील राज्यांसाठी असलेल्या सीमा निश्चित केल्या. परंतुमार्च 1960 मध्ये लोकसभेने राज्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर एका महिन्यानंतर कनिष्ठ सभागृहाने मुंबई राज्याचा ठराव मंजूर केला व 1 मे 1960 रोजी मुंबई राजधानीसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement