Maharashtra Bendur 2019 Wishes: महाराष्ट्र बेंदूर सणाच्या शुभेच्छा मराठी Images, WhatsApp Status, Messages, शुभेच्छापत्रं!
हा सण शेतकीर आणि शेतीशी निगडीत असला तरी, प्रामुख्याने तो शेतकऱ्याचे सोबती असलेल्या बैल आणि इतर पशूंचा अधिक आहे. अर्थात, शेतकऱ्याचे सोबती असलेल्या बैलाना वाचा आणि समज नसली तरी, खास बैलांसाठीच हा सण साजरा केला जातो
Maharashtrian Bendur 2019 Wishes: कृषीसंस्कृती हा देशाचा प्राण. महाराष्ट्र तरी त्याला कसा अपवाद असेल. त्यामुळे कृषीसंस्कृती म्हटलं की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारं आणि इतर गोष्टी आपसूकच आल्या. त्यात आपल्या भारतीय संस्कृतीला सण - उत्सवाचे प्रंचड वेड. शेतकरी, शेती आणि शेतीशी संबंधीत प्राण्यांचा साजरा केला जाणारा सण म्हणजे बेंदूर (Bendur). हा सणसुद्धा या वेडाचाच एक भाग. बेंदूर सण (Bendur Festival) महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. मात्र, हा सण साजरा करण्याच्या पद्धती आणि दिवस प्रदेशानुसार बदलत असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर आणि काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूरही साजरा केला जातो. महाराष्ट्राचा शेतकरी बेंदूर सण मोठ्या उस्ताहात साजरा करतो. यंदा हा सण 15 जुलै 2019 रोजी साजरा होत आहे. आज जरी तुम्ही शहरी भागात राहात असला तरी, आपल्यापैकी बहुसंख्यांकाची नाळ ही शेतीशी जोडलेली आहे. त्यामुळे आपले शेतकरी नातेवाईक आणि शेतकरी मित्रांना बेंदूर सणाच्या हर्दिक शुभच्छा देऊ शकता. बेंदूर सण व्हॉट्सअॅप, एसएमएस, इमेज आदी माध्यमांतून शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पुढील प्रतिमांचा वापर करु शकता.
बेंदूर सण शुभेच्छा संदेश
बैल पोळ्याचा सण
नसे बैलाचे आज जुंपण
घालून झुल, गळा बांधून चाळ
त्यास सजवून आणावं मिरवून
शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा
आला बेंदूर बेंदूर..
सण वर्षाचा घेऊन
खांदेमळणी झाल्यावर लागली चाहूल
सर्जा-राजा गेले आनंदून
शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा
गेली तिफन, गेला कुळव
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला..
दारात नाही सर्जा-राजा
नुसताच कोरडा बेंदूर आला
शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा
जमतील ढग, बरसेल मेघराजा
होईल पाणी पाणी, हटेल दुष्काळ
झटकेल धूळ होईल नवी पहाट
सर्जा-राजासंग बळीराजा करेन नवी सुरुवात
शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा
झुल, शेंब्या, चाळ, घुंगरं..
तिफन, कुळव, शिवाळ
शेती अवजारांचा आज थाट
औताला सुट्टी, सर्जा-राजा आनंदात
शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा
पहा व्हिडिओ:
ग्रामिण भारतातील अनेक प्रमुख सणांपैकी एक सण अशी बेंदूर सणाची ओळख आहे. हा सण शेतकीर आणि शेतीशी निगडीत असला तरी, प्रामुख्याने तो शेतकऱ्याचे सोबती असलेल्या बैल आणि इतर पशूंचा अधिक आहे. अर्थात, शेतकऱ्याचे सोबती असलेल्या बैलाना वाचा आणि समज नसली तरी, खास बैलांसाठीच हा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतीची कामे आणि औताला सुट्टी असते.