Mahakavi Kalidas Din 2021: यंदा महाकवी कालिदास दिन 11 जुलै दिवशी; जाणून घ्या या महान साहित्यकारा विषयी खास गोष्टी!
महाकवी कालिदास या साहित्यकाराच्या स्मरणार्थ आता मध्य प्रदेशामध्ये साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या व्यक्तीला विशेष पुरस्काराने गौरवले जाते.
भारतामध्ये प्रतिभावान साहित्यकारांची मोठी यादी आहे. त्यापैकी संस्कृत भाषेतील ज्येष्ठ कवी आणि नाटककार म्हणजे महाकवी कालिदास (Mahakavi Kalidas). कवी कालिदास यांच्या सहित्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास होऊच शकत नाही त्यामुळे त्यांच्याविषयी आदर असणारा, त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणार्यांचा मोठा वर्ग आहे. मान्यतांनुसार, कालिदास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी झाला आहे. त्यामुळे यंदा आषाढ महिन्याची सुरूवात 11 जुलै दिवशी होणार असल्याने महाकवी कालिदस दिन अर्थात कालिदासांची जयंती रविवारी साजरी केली जाणार आहे.
जाणून घ्या कवी कालिदास यांच्याबद्द्ल काही खास गोष्टी
- कवी कालिदास यांची प्रामुख्याने ओळख त्यांच्या 7 साहित्यांमुळे होते. यामध्ये 3 नाटकं, 2 खंडकाव्य आणि 2 महाकाव्य अशी आहेत. ऋतुसंहार, कुमारसंभवम्, रघुवंशम्, मेघदूत या काव्य रचना, तसेच मलाविकाग्नीमित्र, विक्रमोवंशीय, अभिज्ञान शाकुंतलम् या संस्कृतमधील नाटक-वजा-महाकाव्य रचनांमुळे त्यांना संस्कृत विद्वान म्हणून साहित्यक्षेत्रात ओळख मिळाली आहे. कुमारसंभव व रघुवंश ही दोन महाकाव्ये, तर मेघदूत आणि ऋतुसंहार अशी दोन खंडकाव्ये आहेत.
- महाकवी कालिदास यांच्या आयुष्याबदद्ल मतमतांतर आहेत. त्याची ठोस माहिती उपलब्ध नाही पण साहित्यामध्ये त्यांनी केलेल्या वर्णनावरून त्यांच्या आयुष्याबद्दल काही ठोकथाळे मांडले जातात.
- महाराष्ट्रात नागपूर जवळ असलेल्या रामटेक भागात कालिदासांच्या स्मृतिस्थळा भेट देऊन त्यांचे रसिक महाकवी कालिदास दिन साजरा करतात.
- अभिज्ञान शाकुन्तलम् या कालिदासांच्या नाटकावर आधारित आणि कालिदासांना मानवंदना म्हणून काही पोस्टल स्टॅम्प देखील भारतीय डाक खात्याकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये काही संस्कृत डायलॉग्सचा समावेश आहे.
- काही मान्यातांनुसार उज्जैनचा राजा विक्रमादित्य यांच्या दरबरात कालिदास त्याच्या नवरत्नांपैकी एक होता असे देखील सांगितले जाते.
- 1789 साली अभिज्ञान शाकुन्तलम् हे पहिलं संस्कृत साहित्य होते ज्याचं भाषांतर मॉर्डन युरोपियन भाषेमध्ये केले गेले होते.
महाकवी कालिदास या साहित्यकाराच्या स्मरणार्थ आता मध्य प्रदेशामध्ये साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या व्यक्तीला विशेष पुरस्काराने गौरवले जाते.