Maha Shivratri 2020: मेष ते मीन राशीनुसार तुम्ही असा कराल शंकराला अभिषेक तर पूर्ण होऊ शकतील तुमच्या सर्व मनोकामना

या दिवशी शनि आणि चंद्र मकर राशी, गुरु धनु राशीत, बुध कुंभ राशीत आणि शुक्र मीन राशीत राहतील. त्यामुळे हा योग सिद्धी आणि साधनासाठी खास आहे असे सांगण्यात आले असून या दिवशी पूजा केल्याने अथवा दान केल्याने लाभ मिळतो अशी मान्यता आहे.

Lord Shiva And Horoscope (Photo Credits: PixaBay)

Maha Shivaratri 2020: प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील महाशिवरात्रीचा महिमा मोठा आणि अगाध आहे. या दिवशी अनेक लोक भगवान शंकराती पूजा करुन, उपवास करुन त्याची मनोभावे भक्ती करतात. यावर्षीच्या महाशिवरात्रीचे खास महत्व म्हणजे यंदा एक महायोग होत आहे ज्याला शश योग म्हणतात. हा योग तब्बल 59 वर्षांनी येतो. या दिवशी शनि आणि चंद्र मकर राशी, गुरु धनु राशीत, बुध कुंभ राशीत आणि शुक्र मीन राशीत राहतील. त्यामुळे हा योग सिद्धी आणि साधनासाठी खास आहे असे सांगण्यात आले असून या दिवशी पूजा केल्याने अथवा दान केल्याने लाभ मिळतो अशी मान्यता आहे.

त्याचबरोबर ही महाशिवरात्री मेष ते मीन राशींच्या लोकांनाही लाभदायक आहे. मात्र त्याची त्या त्या राशीच्या लोकांनी विशिष्ट पद्धतीने शिवशंकराला अभिषेक करणे गरजेचे आहे.

पाहूयात राशींप्रमाणे कशा पद्धतीने करावा हा अभिषेक:

मेष- मध, गूळ, उसाचा रस, लाल फूल वाहावे.

वृषभ- कच्चे दूध, दही, पांढरे फूल.

मिथुन- हिरव्या रंगांच्या फुलांचा रस, मूग, बिल्वपत्र.

कर्क- कच्चे दूध, लोणी, मूग, बिल्वपत्र.

सिंह- मध, गूळ, साजुक तूप, लाल फूल.

हेही वाचा- Maha Shivratri 2020 Messages: महाशिवरात्रीच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Wishes, WhatsApp Status, Facebook च्या माध्यमातून देऊन व्हा शिवशंकराच्या भक्तिरसात लीन

कन्या- हिरव्या रंगांच्या फुलांचा रस, मूग, बिल्वपत्र, हिरवे व निळे फूल.

तूळ - दूध, दही, तूप, लोणी, खडीसाखर.

वृश्चिक- मध, साजुक तूप, गूळ, बिल्वपत्र, लाल पुष्प.

धनू- साजुक तूप, मध, खडीसाखर, बदाम, पिवळे फूल, पिळवे फळ.

हेदेखील वाचा- Maha Shivratri 2020 Puja Vidhi: भगवान शंकराला बेलपत्र, दूध याचा अभिषेक का करतात?

मकर- सरसोचे तेल, तिळाच तेल, कच्चे दूध, निळे फूल.

कुंभ- कच्चे दूध, सरसोचे तेल, तिळाचं तेल, निळे फूल.

मीन- ऊसाचा रस, मध, बादाम, बिल्वपत्र, पिवळे फूल, पिळवे फळ.

थोडक्यात भगवान शंकरांची आराधना करण्याचे माध्यम कोणतेही असो मात्र त्या मागची भावना ही खरी आणि मनापासून असेल तर नक्कीच फळाला येईल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही.