Maha Shivratri 2020 निमित्त भगवान शंकराची ही खास गाणी ऐकून मन करा प्रसन्न!
तुम्ही यंदाची महाशिवरात्र भगवान शंकर यांची काही निवडक गाणी ऐकून खास करा.
Maha Shivratri 2020: प्रत्येक महिन्याची वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते. पण माघ वद्य चतुर्दशी ही 'महाशिवरात्र' म्हणून साजरी केली जाते. महाशिवरात्र म्हणजे 'शिवाची महान रात्र.' महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभरात अगदी उत्साहात साजारा केला जातो. भारतात शिवाची भव्य मंदिरं असून त्या ठिकाणी पूजेसोबतच विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. इतकंच नाही अगदी लहान देवळांमध्येही महाशिवरात्रीचा उत्सव तितक्याच भक्तीभावाने साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्र शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी येत आहे. महाशिवरात्री निमित्त अनेक शिवभक्त उपवास करतात. (Maha Shivratri 2020 Puja Vidhi: भगवान शंकराला बेलपत्र, दूध याचा अभिषेक का करतात?)
शंकराला बेल अतिशय प्रिय असल्याने या दिवशी भगवान शंकराला दुधाने स्नान घालून बेलाची पानं वाहून पूजा केली जाते. तसंच आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवभक्त शंकराची आराधना करतात. तुम्ही यंदाची महाशिवरात्र भगवान शंकर यांची काही निवडक गाणी ऐकून खास करा.
शिव शंकराची काही खास गाणी:
थोरली जाऊ सिनेमातील 'शंभो शंकरा करुणाकरा' हे अनुराधा पौडवाल गाणे अत्यंत मंत्रमुग्ध करणारे आहे.
महानंदा सिनेमातील 'मागे उभा मंगेश' हे गाणे सर्वांचेच आवडते आहे. आशा भोसले यांचा सदाबहार आवाज या गाण्याला लाभला आहे.
माहेरची माणसं या सिनेमातील 'तिथे नांदे शंभो कैलासाचा पती' या गाण्यात बारा ज्योर्तिलिंगांचे दर्शन घडते.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या केदारनाथ सिनेमातील 'नमो नमो' गाणे.
या गाण्याने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या तानाजी सिनेमातील 'शंकरा रे शंकरा' हे गाणे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्याच ओठी अगदी सहज रंगाळते. विशेष म्हणजे या सिनेमातील अजय देवगन याचा हटके डान्स प्रेक्षकांना भलताच भावला आहे.
हिंदू परंपरेनुसार, फाल्गुन महिन्याच्या 13 व्या रात्री आणि 14 व्या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भक्तगण उपवास, व्रत, जप, जागरण अशा विविध माध्यमातून भगवान शिवाची पूजा-प्रार्थना करतील. त्याचबरोबर यंदाच्या महाशिवरात्रीला भगवान शंकाराची ही गाणी तुमचे मन प्रसन्न करतील यात कोणतंच दुमत नाही.