Maghi Jayanti Rangoli 2025

Maghi Ganesh Jayanti Rangoli Design: गणेश जयंती हा एक शुभ हिंदू सण आहे जो भगवान गणेशाच्या जन्मदिनाचे प्रतीक आहे. माघ शुक्ल चतुर्थी, तिळकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी या नावानेही ओळखला जाणारा हा दिवस बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. विशेषत: महाराष्ट्र आणि गोव्यात हा लोकप्रिय सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी येतो, जो ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये जानेवारी/फेब्रुवारीशी संबंधित आहे. 2025 मध्ये गणेश जयंती शनिवारी, 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. १ फेब्रुवारी ला गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हिंदू पौराणिक कथांनुसार, या दिवशी भगवान गणेशाचा जन्मदिवस असतो. गणेश जयंतीच्या या दिवसाला विनायकी चतुर्थी किंवा तिळकुंड चतुर्थी असेही म्हणतात.

गणेश चतुर्थीमध्ये ज्याप्रमाणे गणपती बाप्पाला घरात आणले जाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही घरांमध्ये श्रींच्या वाढदिवसाला दीड दिवस घरात आणले जाते. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मान्यतेनुसार माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या तत्वांमध्ये हजार पटीने वाढ होते. गणेशभक्तांसाठी हे दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. दरम्यान, हिंदू धर्मात प्रत्येक शुभ प्रसंगी रांगोळी काढण्याची पद्धत आहे. या खास प्रसंगीही तुम्ही कोणती रांगोळी काढायची याचा विचार करत असाल तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत. व्हिडीओ पाहून तुम्ही हटके रांगोळी काढू शकता.

माघी गणेश जयंती निमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन, येथे पाहा 

माघी गणेश जयंती निमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन, येथे पाहा 

माघी गणेश जयंती निमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन, येथे पाहा 

माघी गणेश जयंती निमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन, येथे पाहा 

माघी गणेश जयंती निमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन, येथे पाहा 

गणेश जयंतीच्या दिवशी राज्यात काही ठिकाणी हळद किंवा सिंदूराने गणेशमूर्ती बनवण्याची ही परंपरा आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी मूर्तीचे विसर्जन केले जाते. पूजेच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना तिळाच्या लेपने स्नान केले जाते. गणेशभक्तांसाठी हा खास दिवस आहे. असे मानले जाते की या दिवशी गणपतीची पूजा करणाऱ्यांना वर्षभर समृद्धी मिळते, या व्रतामुळे घरात सुख, शांती देखील वाढते आणि प्रत्येकाच्या मनोकामना देखील पूर्ण होतात.