Maghi Ganesh Jayanti 2025 Mehendi Designs: मेहेंदीच्या मनमोहक डिझाइन्स हातावर काढून बनवा माघी गणेश जयंतीचा सण खास, पाहा ट्यूटोरियल व्हिडिओ

माघी गणेश जयंती सणासाठी महिला हातावर मेहेंदी काढून सुंदर शृंगार करतात, तर तुम्हीही माघी गणेश जयंतीनिमित्त काढता येतील अशा हटके डिझाईन्सच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी सुंदर आणि आकर्षक मेहेंदी डिझाइन्सचे ट्यूटोरियल व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही माघी गणेश जयंतीचा सण आणखी खास बनवू शकता.

Maghi Ganesh Jayanti 2025 Mehendi Designs: मेहेंदीच्या मनमोहक डिझाइन्स हातावर काढून बनवा माघी गणेश जयंतीचा सण खास, पाहा ट्यूटोरियल व्हिडिओ
Mehendi Design 2025

Maghi Ganesh Jayanti 2025 Mehendi Designs: भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लाडके पुत्र भगवान गणेश हे देवांमध्ये प्रथम पूजनीय मानले जातात, त्यांचा जन्म म्हणून गणेश जयंतीचा सण साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. माघी गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते. यावर्षी माघी गणेश जयंती 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जात आहे, ज्याला माघ विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी देखील म्हणतात. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कोकणातील किनारपट्टी भागात धुमधडाक्यात साजरा केला जातो. माघी गणेश जयंतीला अनेक जण घरोघरी आणि मंडपात गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. या सणाची शुभता वाढावी म्हणून रांगोळीच्या मनमोहक डिझाइनने घर-अंगण सजवले जाते. अशातच जर सणासाठी महिला हातावर मेहेंदी काढून सुंदर शृंगार करतात, तर तुम्हीही माघी गणेश जयंतीनिमित्त काढता येतील अशा हटके डिझाईन्सच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही माघी गणेश जयंतीचा सण आणखी खास बनवू शकता.

येथे पाहा माघी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर काढता येतील अशा हटके मेहेंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ 

माघी गणेश जयंतीच्या सणाची तयारीही लोक अनेक दिवस अगोदरच सुरू करतात. दक्षिण भारतीय मान्यतेनुसार, या पवित्र दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता, म्हणून माघी गणेश जयंतीला भगवान शिव आणि माता पार्वतीचे लाडके पुत्र भगवान गणेशाची पूजा केली जाते. दरम्यान, या खास प्रसंगी तुम्ही हटके मेहेंदी हातावर काढून हा सण आणखी खास बनवू शकता.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).