Lalita Panchami Vrat 2020 : शारदीय नवरात्री मधील पंचमी ललिता पंचमी; जाणून घ्या त्याचं महत्त्व!
ललिता पंचमी ही तिथी 20 ऑक्टोबरच्या दुपारी 11 वाजून 19 मिनिटांनी सुरू होईल तर समाप्ती 21 ऑक्टोबरला 9 वाजून 07 मिनिटांनी होणार आहे.
Navratri 2020: शारदीय नवरात्रीचा (Sharadiya Navratri) पाचवा दिवस हा ललिता पंचमी (Lalita Panchami) म्हणून साजरा केला जातो. यंदा ललिता पंचमी ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, 21 ऑक्टोबर, बुधवार दिवशी आहे.नवरात्र हा उत्सवच मूळात स्त्री शक्तीचा जागर करण्याचा, आदि शक्तीला नमन करण्याचा असल्याने प्रत्येक दिवशी काही खास गोष्टी असतात. भारतामध्ये काही प्रांतात नवरात्रीचा उत्सव अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजेच घटस्थापनेपासून केला जातो तर काही ठिकाणी पंचमी ते नवमी किंवा षष्ठी ते नवमी असा असतो. महाराष्ट्रासह उत्तर भारतामध्ये शारदीय नवरात्रोत्सवामध्ये पंचमीच्या तिथीला खास महत्त्व आहे. ललिता पंचमीचा दिवस हा उपांग ललिता व्रत यासाठी असतो. इच्छिलेले सारे मिळवण्यासाठी नवरात्रीच्या पंचमीला ललिता देवीची आराधना करण्याची प्रथा आहे. Kanya Pujan 2020 Shubh Muhurat: नवरात्रोत्सवात यंदा कधी कराल कन्या पूजन? जाणून घ्या महत्त्व आणि विधी.
महिला, नवविवाहित महिला ललिता पंचमी ही वंशवृद्धीसाठी करतात. तर विद्यार्थी दशेतील भाविक ललिता पंचमी दिवशी विद्या, ज्ञान प्राप्तीसाठी देखील व्रत करतात. Navratri 2020 Calendar: घटस्थापना, खंडे नवमी ते दसरा यंदा नवरात्री मध्ये कोणत्या दिवशी? जाणून घ्या त्याचे पुजा विधी, महत्त्व.
ललिता पंचमीचं महत्त्व
अश्विन शुक्ल पंचमीचा दिवस हा ललिता पंचमी म्हणून साजरा करण्याची पारंपारिक पद्धत आहे. हिंदू पुराण कथांनुसार, एकदा भगवान विष्णूने पातळ लोकाचा सर्वनाश करण्यासाठी सुदर्शन चक्र चालवलं होतं. मात्र यामुळे पृथ्वी जलमग्न झाली, जीव जंतूंच्या जीवनावर परिणाम व्हायला लागला. यानंतर ऋषी-मुनींनी माता ललिता देवीची आराधना केली. देवी प्रार्थनेने प्रसन्न झाली. पृथ्वीला विनाशापासून वाचवले आणि नवं जीवनदान दिले. त्यामुळे नवरात्रीमध्ये ललिला पंचमीला विशेष महत्त्व आहे.
ललिता पंचमी तिथी, वेळ
ललिता पंचमी ही तिथी 20 ऑक्टोबरच्या दुपारी 11 वाजून 19 मिनिटांनी सुरू होईल तर समाप्ती 21 ऑक्टोबरला 9 वाजून 07 मिनिटांनी होणार आहे.
यंदा शारदीय नवरात्रीची सुरूवात 17 ऑक्टोबरला झाली असून समाप्ती नवमीला 25 ऑक्टोबरला होणार आहे. यंदा दसरा देखील 25 ऑक्टोबरला साजरा केला जाईल.
(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. लेटेस्टली मराठी कोणत्याही माहितीची पुष्टी करत नाही. तसेच धार्मिक भावना दुखावण्याचाआमचा हेतू नाही.)