Kumbh Mela 2019: यंदा कुंभमेळा असेल कॅशलेस; दक्षिणा आणि शॉपिंगसाठी Paytm, स्वाईप मशीन्सची सोय
यंदाचा कुंभमेळा हा उत्तोमत्तम सुविधांनी सज्ज असणार आहे.
Kumbh Mela 2019: यंदाचा कुंभमेळा (Kumbh Mela) हा उत्तोमत्तम सुविधांनी सज्ज असणार आहे. कुंभमेळ्यासाठी यंदा प्रयागराज येथे टेंट सिटी आणि वायफायची (Wi-Fi) सुविधा देण्यात आली आहे. तर भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी पाच किनाऱ्यांवर घाट बांधण्यात आला आहे. त्याचबरोबर यंदाचा कुंभमेळा हा कॅशलेस करण्यासाठी सरकारने पाऊलं उचलली आहेत. कुंभमेळ्यात शॉपिंगसाठी किंवा दक्षिणा देण्यासाठी पे टीएम (Pay Tm) आणि स्वाइप मशीन (Swipe Machine) चे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. प्रयागराज कुंभमेळ्यासाठी रेल्वेने तिकीट बुकिंगमध्ये दिली खास सवलत !
या सुविधेसोबतच कुंभमेळ्यातील भक्तांसाठी खास 'ई-रुपया' लॉन्च करण्यात आला आहे. भक्त मेळ्यातील स्टॉलवर कॅश जमा करुन 'ई-रुपया कार्ड' घेऊ शकतात आणि खर्च करु शकतात. खर्च करुन झाल्यावर शिल्लक राहिलेले पैसे परत घेण्याचीही सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कुंभमेळ्यात 'या' दिवशी होणार शाही स्नान; जाणून घ्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व
कुंभमेळ्यातील 1000 स्टॉल्सवर स्वाईप मशीनची सुविधा असेल. याशिवाय एटीएम (ATM) मशीन्सही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.