Kojagiri Purnima 2020 Rangoli Design: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'या' सोप्प्या आणि सुंदर रांगोळ्या घराबाहेर काढून साजरा करा सण

Kojagiri Purnima Simple Rangoli Design: कोजागिरी पौर्णिमेचा दिवस म्हणजे माता लक्ष्मीचा जन्म दिवस अशी अख्यायिका आहे. या दिवशी समुद्रमंथनातून माता लक्ष्मी प्रकट झाली असे मानले जाते तर शरद पौर्णिमेच्या रात्रीच पृथ्वीतलावर येऊन ती सजग असलेल्या मनुष्याला आशिर्वाद देते.अश्विन महिन्यातील शुल्क पक्षच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे म्हटले जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमा येत्या 30 ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाणार आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी चंद्राच्या सोळा कला एकत्रित येत संपूर्ण चंद्र दिसतो. त्याचसोबत या दिवशी चंद्रामधून येणारी किरणे ही अमृताचा वर्षाव करतात अशी ही मान्यता आहे. खरंतर संपूर्ण वर्षभरात पौर्णिमा येत राहतात मात्र शरद पौर्णिमेचे अधिक महत्व आहे. शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे ही म्हटले जाते. या दिवशी मसाले दूध, खीर असे गोडाचे पदार्थ खासकरुन बनले जातात.

शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा सुद्धा केली जाते. या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. तर यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुमच्या घरासमोर किंवा अंगणात 'या' सोप्प्या आणि सुंदर रांगोळ्या काढून हा सण साजरा करा.(Kojagiri Purnima 2019 Images: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करून चंद्राच्या किरणांप्रमाणे द्या शीतलमय शुभेच्छा)

कोजागिरीला प्रत्येक प्रांतात वेगवेगळी नावाने ओळखले जाते. गुजरातमध्ये 'शरद पूर्णिमा', ओडिशामध्ये 'कुमार पौर्णिमा', बंगालमध्ये 'लोख्खी पूजो' असे म्हणतात. उपवास, पूजन व जागरण याचे या व्रतात महत्त्व आहे.कोजागरीच्या रात्री मंदिरे,घरे,रस्ते,उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात. लेटेस्टली मराठीकडून तुम्हालाही कोजागिरीच्या खूप सा-या शुभेच्छा!!!